जि. प. अध्यक्षाच्या निवडीसाठी २१ सप्टेंबरला विशेष सभा
By Admin | Updated: September 11, 2014 01:11 IST2014-09-11T00:45:11+5:302014-09-11T01:11:10+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अध्यक्ष - उपाध्यक्ष, सभापती व उपसभापतींच्या निवडीच्या बैठका अनुक्रमे दि. २१ व दि. १४ सप्टेंबरला घ्याव्यात, असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.

जि. प. अध्यक्षाच्या निवडीसाठी २१ सप्टेंबरला विशेष सभा
औरंगाबाद : जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अध्यक्ष - उपाध्यक्ष, सभापती व उपसभापतींच्या निवडीच्या बैठका अनुक्रमे दि. २१ व दि. १४ सप्टेंबरला घ्याव्यात, असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. पदाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. अनेक वर्षांनंतर यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी चुरस वाढली आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र जिल्हा परिषद सदस्यांना मंगळवारी प्राप्त झाले आहे. त्याच दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता मतदान होईल. त्यामुळे अध्यक्ष- उपाध्यक्षांच्या निवडीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. पंचायत समितीचे सभापती व उपसभापतींच्या निवडीच्या विशेष सभा दि. १४ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर आयोजित केल्या जातील. त्यात सकाळी १० ते १२ पर्यंत नामनिर्देशनपत्रे घेणे, १२ ते १ यावेळेत नामनिर्देशनपत्रे दाखल करणे व त्यानंतर दुपारी ३ वाजता प्रत्यक्ष मतदान होणार आहे.