जि. प. ने काढला बदल्यांचा मुहूर्त!
By Admin | Updated: May 13, 2014 00:59 IST2014-05-13T00:25:13+5:302014-05-13T00:59:13+5:30
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया १७ मेपासून सुरू होत आहे.

जि. प. ने काढला बदल्यांचा मुहूर्त!
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया १७ मेपासून सुरू होत आहे. १७ ते २३ मे या काळात कर्मचार्यांच्या प्रशासकीय तसेच विनंती बदल्या केल्या जाणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले. जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया दरवर्षी एप्रिल महिन्यात सुरू होते. यंदा निवडणुकीमुळे प्रक्रिया लांबली. आता १७ मेपासून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरवर्षी प्रशासकीय कारणावरून १० टक्के आणि विनंतीवरूनही १० टक्के बदल्या करण्यात येतात. गतवर्षीप्रमाणे यंदाही समुपदेशन पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि पंचायत विभागातील पाच टक्के कर्मचार्यांच्या बदल्या जिल्हास्तरावरून आणि उर्वरित पाच टक्के तालुकास्तरावरून केल्या जाणार आहेत. प्रशासकीय आणि विनंती या दोन्ही प्रकारच्या बदल्या याच सूत्राने होणार आहेत. इतर विभागांच्या सर्व बदल्या जिल्हास्तरावरूनच होणार आहेत. जिल्हा परिषदेत शिक्षकांचा सर्वाधिक मोठा संवर्ग आहे. शिक्षण विभागात एकूण ९ हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे या संवर्गातील बदल्या सर्वात आधी होणार आहेत. त्यानंतर उर्वरित विभागांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडेल. बदल्यांचा कार्यक्रम तारीखविभाग १७ मे शिक्षण विभाग १९ मेकृषी, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन २० मे सामान्य प्रशासन, बांधकाम २१ मेपंचायत २२ मेआरोग्य २३ मेवित्त, पाणीपुरवठा