जि. प. कर्मचाऱ्यांचे वेतन आता १ तारखेला

By Admin | Updated: April 19, 2015 00:49 IST2015-04-19T00:27:48+5:302015-04-19T00:49:52+5:30

बीड : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन झाल्यानंतरही काही त्रूटी आहेत. त्यामुळे वेतनासाठी दोन- दोन महिने प्रतीक्षा करावी लागते

District Par. Employees' wages are now on 1 st date | जि. प. कर्मचाऱ्यांचे वेतन आता १ तारखेला

जि. प. कर्मचाऱ्यांचे वेतन आता १ तारखेला


बीड : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन झाल्यानंतरही काही त्रूटी आहेत. त्यामुळे वेतनासाठी दोन- दोन महिने प्रतीक्षा करावी लागते. जून महिन्यापासून १ तारेखालाच कर्मचाऱ्यांच्या हातात वेतन पडणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी ही महिती दिली.
जि.प. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सेवार्थ तर शिक्षकांसाठी शालार्थ ही आॅनलाईन प्रणाली आहे. कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या तारखेला वेतन मिळणे गरजेचे आहे. मात्र, ते मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमार होते. वेतनातील त्रूटी दूर करण्याच्या संदर्भात शनिवारी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी सभागृहात विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी १ तारेखलाच वेतन मिळाले पाहिजे, यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून दिला.

Web Title: District Par. Employees' wages are now on 1 st date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.