जिल्हास्तरीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत परमेश्वर, आनंद चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:36 IST2018-01-23T00:36:07+5:302018-01-23T00:36:32+5:30
विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स मैदानावर नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत परमेश्वर माने, आनंद गोटवाल, सुभाष सज्जन यांनी विशेष ठसा उमटवताना पदकांची लूट केली.

जिल्हास्तरीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत परमेश्वर, आनंद चमकले
औरंगाबाद : विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स मैदानावर नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत परमेश्वर माने, आनंद गोटवाल, सुभाष सज्जन यांनी विशेष ठसा उमटवताना पदकांची लूट केली.
या स्पर्धेत विविध गटांतील पदकविजेत्या खेळाडूंत परमेश्वर माने, आनंद गोटवाल, सुभाष सज्जन, अनिल मोरे, प्रवीण मोकासे, अजित होंदरणे, विनोद मोहोर, गणेश चोपडे, राहुल नागे, दीपक शिंदे, अनंत नसवाले, शुभम खिरळकर, विकास राठोड, गणेश शेळके, एकनाथ पाचे, मोहंमद आरेफ मो. रियाज, अशोक वाठोरे आदींचा समावेश आहे. या स्पर्धेत १00 मी., २00 मी. व ४00 मी. धावणे, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक आदी क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेत ४0 खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन सतीश लोणीकर व गौतम नाथानी यांच्या हस्ते झाले. यावेळी औरंगाबाद जिल्हा पॅरा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष विनोद नरवडे, सचिव डॉ. दयानंद कांबळे, कोषाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे, प्रभूलाल पटेल आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. सचिन देशमुख, डॉ. फेरोज सय्यद, किशोर नावकर, राहुल अहिरे, अनिल मोटे आदींनी परिश्रम घेतले.