रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण स्वीकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:25 IST2017-08-24T00:25:18+5:302017-08-24T00:25:18+5:30
मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे व त्यांच्या दुरवस्थेबाबतच्या तक्रारी जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांच्या सदस्य सचिवांकडून स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे़ जिल्हा विधिसेवा प्राधिकरणच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका नंबर ७१/२०१३ मध्ये संमत करण्यात आलेल्या आदेशानुसार रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबतच्या तक्रारी संदर्भात नोडल अधिकारी म्हणून जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे़

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण स्वीकारणार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे व त्यांच्या दुरवस्थेबाबतच्या तक्रारी जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांच्या सदस्य सचिवांकडून स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे़
जिल्हा विधिसेवा प्राधिकरणच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका नंबर ७१/२०१३ मध्ये संमत करण्यात आलेल्या आदेशानुसार रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबतच्या तक्रारी संदर्भात नोडल अधिकारी म्हणून जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे़
रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था पाहता उच्च न्यायालयाने सर्वसामान्य जनतेस त्यांच्या तक्रारी संदर्भात दाद मिळावी, याकरिता जिल्हा विधि सेवा प्राधिकरण येथे कक्ष स्थापन केला आहे़ त्यामुळे परभणी महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील संबंधित नगरपालिका अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे व त्यांची दुरवस्था याबाबत तक्रारी असल्यास त्या ’ि२ंस्रं१ुँंल्ल्र@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेलवर किंवा सदस्य सचिव, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण परभणी दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९७४० या पत्त्यावर पोस्टाद्वारे अथवा प्रत्यक्ष आणून द्याव्यात, तसेच तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारी संबंधित महापालिका, नगरालिका यांच्याकडे सुद्धा दाखल कराव्यात, असेही या संदर्भातील प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे़