जिल्ह्यात मटका, जुगार अड्ड्यांवर धाडसत्र सुरू
By Admin | Updated: July 18, 2014 01:45 IST2014-07-18T00:19:22+5:302014-07-18T01:45:38+5:30
बीड: जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या सूचनेनुसार मटका, जुगार अड्डे व अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने ५ पथके स्थापन केली आहेत.

जिल्ह्यात मटका, जुगार अड्ड्यांवर धाडसत्र सुरू
बीड: जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या सूचनेनुसार मटका, जुगार अड्डे व अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने ५ पथके स्थापन केली आहेत.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक वाढली आहे. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. याला आळा बसावा म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास २० हून अधिक अवैध प्रवासी वाहतूक चालकावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान ग्रामीण भागासह शहरी भागातील बसस्थानक परिसरात मटका चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास ४० हून अधिक मटका अड्ड्यावर धाड टाकून तेथे मटका घेणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या मालकावरही गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे मटका चालकांमध्ये दहशत पसरली आहे. जुगार खेळणाऱ्या व्यक्तींनाही पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आहे. जवळपास २५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून धाडसत्र पथकामार्फत सुरू आहे.
प्रशिक्षणार्थी डीवायएसपींच्या
जुगार अड्ड्यावर धाडी
प्रशिक्षणार्थी डीवायएसपी एन.डी. शिरगावकर आणि एस.ए. खिरडकर यांच्या पथकाने बुधवारी वडवणी बाजारतळावर जाऊन गुडगुडी नावाचा जुगार खेळत असणाऱ्या आठजणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील ४२ हजार ११० रुपयांची रक्कम जप्त केली तर पिंपळनेरमध्ये मटका घेणाऱ्या दोन आरोपींना अटक करुन ६ हजार ४४० रुपये जप्त केले. त्यानंतर सायंकाळी बीड शहरातील अंकुशनगरमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या तिघांना अटक करुन त्यांच्याकडून ६५ हजार ३४० रुपये जप्त केले.
एका ठिकाणी तीन धाडी टाकून १ लाख १३ हजार रुपयांसह १४ आरोपी गजाआड केले आहे. (प्रतिनिधी)