शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

जिल्हा रुग्णालयाची आणखी ९० लाखांची औषधी झाली कालबाह्य; भरारी पथकाला कागदपत्रेच दिली नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 11:22 AM

आणखी ९० लाख रुपयांची औषधी कालबाह्य झालेली आहेत. ही औषधी लपवून ठेवण्यात आली असून, भरारी पथकासमोर या औषधीची कागदपत्रेच सादर करण्यात आलेली नाहीत.

ठळक मुद्देजिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचा धक्कादायक अहवाल मागील महिन्यात शासनाच्या भांडार तपासणी पथकाने आरोग्य उपसंचालकांना देऊन एकच खळबळ उडवून दिली. आणखी ९० लाख रुपयांची औषधी कालबाह्य झालेली आहेत. ही औषधी लपवून ठेवण्यात आली असून, भरारी पथकासमोर या औषधीची कागदपत्रेच सादर करण्यात आलेली नाहीत.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचा धक्कादायक अहवाल मागील महिन्यात शासनाच्या भांडार तपासणी पथकाने आरोग्य उपसंचालकांना देऊन एकच खळबळ उडवून दिली. या औषध खरेदी घोटाळ्याचा पर्दाफाश ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात करताच आरोग्य विभागाची झोपच उडाली आहे. ‘लोकमत’ने या प्रकरणाच्या आणखी खोलात जाऊन माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता दुसरी खळबळजनक बाब समोर आली. आणखी ९० लाख रुपयांची औषधी कालबाह्य झालेली आहेत. ही औषधी लपवून ठेवण्यात आली असून, भरारी पथकासमोर या औषधीची कागदपत्रेच सादर करण्यात आलेली नाहीत.

जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात औषधी पाठविण्यात येते. विभागनिहायही काही औषधी खरेदी करण्याचे अधिकार संबंधित अधिका-यांना शासनाने दिलेले आहेत. आमखास मैदान येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचा-यांनी चिकलठाणा येथील २०० खाटांच्या हॉस्पिटलसाठी मोठ्या प्रमाणात औषधी खरेदी करून ठेवल्याचे समोर आले आहे. ही औषधी कालबाह्यही झाली आहे. त्यामुळे शासनाला तब्बल दीड कोटी रुपयांना चुना लागला आहे.

लेखा कोषागार कार्यालयातील एका पथकाला आपल्या विभागातील कोणतेही शासकीय भांडार तपासण्याचे अधिकार आहे. शासन आदेशानुसार हे पथक संबंधित विभागाला कोणतीही पूर्वसूचना न देता भांडार विभागाची तपासणी करीत असते. मागील महिन्यात या कार्यालयातील भरारी पथकाने आमखास येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भांडार विभागाची अचानक झाडाझडती घेतली. त्यात दीड कोटी रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचे पथकासमोर आले. हे दृश्य पाहून पथकही चक्रावले. पथकातील कर्मचाºयांनी प्राथमिक चौकशी केली असता ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचे समोर आले. 

रेकॉर्डच केले गायबकोणत्याही भांडार विभागात लाइव्ह स्टॉक आणि डेड स्टॉक रजिस्टर मेन्टेन करण्याची पद्धत असते. जिल्हा सामान्य रुग्णालयातील भांडार विभागाने असे काहीच केलेले नाही. कोणत्या रुग्णालयाला आजपर्यंत किती औषधी पाठविली, याचेही रेकॉर्ड नाही. भांडार विभागात एकूण दीड कोटी रुपयांची औषधी कालबाह्य झालेली आहे. याच्या चौकशीसाठी कागदपत्रांची वारंवार मागणी केल्यानंतरही भरारी पथकाला कागदपत्रे देण्यात आली नाहीत. हे सर्व रेकॉर्ड अधिकारी व कर्मचा-यांनी गायब केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

उच्चस्तरीय चौकशीची गरजदीड कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतरही आरोग्य उपसंचालक, मुंबई येथील आरोग्य विभाग अजूनही हे प्रकरण गांभीर्याने हाताळायला तयार नाही. मागील तीन दिवसांपासून फक्त चौकशीचा फार्स मांडण्यात आला आहे. दोषींवर कारवाई करणारच, असा आव आणण्यात येत आहे. सर्व वस्तुस्थिती पाण्यासारखी समोर असतानाही काही अधिकारी व कर्मचा-यांना वाचविण्यासाठी स्थानिक स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभागाने मुंबईच्या अधिका-यांना पाचारण करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.