जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यास मारहाण
By Admin | Updated: July 9, 2015 00:20 IST2015-07-09T00:20:34+5:302015-07-09T00:20:34+5:30
बीड : जिल्हा रूग्णालयातील एका कर्मचाऱ्यास एका तरूणाने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.

जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यास मारहाण
बीड : जिल्हा रूग्णालयातील एका कर्मचाऱ्यास एका तरूणाने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
बीड येथील जिल्हा रूग्णालयात एक तरूण उपचारासाठी हाताला मार लागल्याने वार्ड क्रमांक ११ मध्ये दाखल झाला होता. तेथे संजय गागट हा कर्मचारी उपचार करीत होता. त्या तरूणाने हातावर पट्टी बांधण्याची मागणी गागट यांच्याकडे केली. मात्र, येथे उपचार होत नसून वार्ड क्रमांक १९ मध्ये केले जातात, असे सांगितले असता सदरील तरूणाने गागट यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या ते जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेसंदर्भात पोलिसांनी गागट यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती करून घेतली. त्यानंतर एमएलसी नोंद केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
दरम्यान, कर्मचाऱ्यांना मारहाण केलेल्या घटनेचा निषेध इतर कर्मचाऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)