जिल्हा रुग्णालयास लातुरात जागा मिळेना
By Admin | Updated: October 9, 2014 00:38 IST2014-10-09T00:20:09+5:302014-10-09T00:38:30+5:30
सितम सोनवणे , लातूर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने १७ जानेवारी २०१३ च्या ब्रहत आराखड्यात लातूर जिल्ह्यात ट्रामा केअर सेंटर तसेच नव्या रुग्णालयाची घोषणा करण्यात आली़ यात

जिल्हा रुग्णालयास लातुरात जागा मिळेना
सितम सोनवणे , लातूर
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने १७ जानेवारी २०१३ च्या ब्रहत आराखड्यात लातूर जिल्ह्यात ट्रामा केअर सेंटर तसेच नव्या रुग्णालयाची घोषणा करण्यात आली़ यात लातूरला नवीन जिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे़ पण या रुग्णालयास शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा मिळत नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक हे जागेच्या प्रतिक्षेत असून या वर्षी हे रुग्णालय चालू होईल कि नाही अशी शंका नागरिकांतून व्यक्त होत आहे़
राज्य शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यातील गरीब रुग्णासाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी १७ जानेवारी २०१३ ला जिल्हा रुग्णालय व ट्रामा केंद्र जिल्हा भरात सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे़ त्यातील काही ट्रामा केंद्र सुरु ही झाले आहे़ पण लातूर जिल्ह्यासाठी १०० खाटाचे जिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे़ लातूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी आसनारे जिल्हा रुग्णालय व कस्तुरबा गांधी स्त्री रुग्णालयाचे २००७ मध्ये वैद्यकिय महाविद्यालयाकडे चल, अचल साधनांसह हस्तांतरीत करण्यात आले आहे़ तेव्हापासून लातुरात जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालय नसल्याने आरोग्य विभागाने २०११ मध्ये १०० खाटाचे स्त्री रुग्णालयास मंजुरी देवून ते त्याचवर्षी लेबर कॉलनी येथे सुरुही करण्यात आले आहे़ त्याचा फायदा स्त्री रुग्णांना मोठ्या प्रमाणात होत आहे़ ग्रामीण भागातील महिलांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ ही घेताहेत़ पण जिल्हा रुग्णालयास शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध होत नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ बी़एस़ कोरे हे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या कडे मागील ९ महिण्यापासून पाठपूरावा करत आहेत़ त्या मुळे जिल्हा रुग्णालय जागेच्या प्रतिक्षेत आहे़ जागा मिळाल्यानंतरच पुढील हालचालीना वेग येतो़ त्यानंतर रुग्णालयाचे काम चालू करण्यासाठी तसेच इमारत उभारण्यासाठीचे प्रयत्न केले जातात़ त्यानंतर स्टाफ मान्यता आदी बाबीची पूर्तता करण्यात तीन ते चार वर्षाचा कालावधी लागू शकतो़