जिल्ह्यात दोन दिवसांत ५७४ मि़ मी़ पाऊस

By Admin | Updated: August 29, 2014 01:27 IST2014-08-29T00:45:55+5:302014-08-29T01:27:29+5:30

नांदेड: तीन महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाचे अखेर जिल्ह्यात आगमन झाले असून दोन दिवसांत ५७४ मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यात सर्वच तालुक्यात

The district has 574 mm rain in two days | जिल्ह्यात दोन दिवसांत ५७४ मि़ मी़ पाऊस

जिल्ह्यात दोन दिवसांत ५७४ मि़ मी़ पाऊस


नांदेड: तीन महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाचे अखेर जिल्ह्यात आगमन झाले असून दोन दिवसांत ५७४ मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे़ त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे़ असे असले तरी अद्याप पावसाची आवश्यकता असून आतापर्यंत केवळ २६ टक्केच पाऊस झाला आहे़
यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळविले़ जुन, जुलै व आॅगस्ट या महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार, तीबार पेरण्या करण्याची वेळ आली़ जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला़ पोळ्यापर्यंत पावसाने पाठ दाखविल्याने शेतकरी चिंतेत होता़ मात्र ऐन पोळ्याच्या दिवशी पावसाने हजेरी लावत पुनरागमन केले़ त्यानंतर जिल्ह्यात २६, २७ व २८ या तिन्ही दिवशी दमदार पाऊस झाला़ २७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात झालेल्या एकूण पावसाची २२७़७१ मि़ मी तर २८ रोजी ३४७़ ८५ मि़ मी़ नोंद झाली़ १ जून ते २७ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सरासरी २२७़७१ मि़ मी़ पाऊस झाला़ १ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ९५५़ ५५ मि़ मी़ पाऊस पडतो़ त्यानुसार २६़ ११ टक्के पाऊस पडला आहे़ मागील वर्षी तीन महिन्याच्या कालावधीत ८५२़ ०९ मि़ मी़ पाऊस पडला होता़ तर २०१२ मध्ये ४५४़४८ मि़ मी़ सरासरी पावसाची नोंद झाली होती़ या आकडेवारीवरून पावसाची कमतरता अजूनही जाणवत आहे़ परंतु उशिरा का होईना पावसाने सुरूवात केल्यामुळे सप्टेंबर महिन्यात अपेक्षित पावसाची प्रतिक्षा होत आहे़ तसे झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे़
यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद माहूर, मुखेड तालुक्यात झाली आहे़ तर सर्वात कमी पाऊस मुदखेड, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर, बिलोली या तालुक्यात झाला आहे़ या तालुक्यात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची नोंद पुढील प्रमाणे, नांदेड - २५२़८५ मि़मी़, मुदखेड - १७७़३४, अर्धापूर - १७१़६८, भोकर - २५०़९५, उमरी - २७६़०१, कंधार - २०४़४७, लोहा - २१९़६७, किनवट - २६७़१०, माहूर - ३०८़६२, हदगाव - १८६़२६, हिमायतनगर - १७३़०४, देगलूर - २१३़०१, बिलोली - १८२़४०, धर्माबाद - २१५़३३, नायगाव - २३८़६०, मुखेड - ७९६़ ६७़ (प्रतिनिधी)

Web Title: The district has 574 mm rain in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.