जिल्ह्यात गुरूपौर्णिमा उत्साहात

By Admin | Updated: July 13, 2014 00:18 IST2014-07-12T23:58:39+5:302014-07-13T00:18:03+5:30

बीड : जिल्ह्यात शनिवारी शाळा, महाविद्यालयांसह मंदिरांमध्ये गुरूपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.

In the district, Gurupournima is excited | जिल्ह्यात गुरूपौर्णिमा उत्साहात

जिल्ह्यात गुरूपौर्णिमा उत्साहात

बीड : जिल्ह्यात शनिवारी शाळा, महाविद्यालयांसह मंदिरांमध्ये गुरूपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकांचे स्वागत करून गुरूजणांचा सन्मान केला. तर धार्मिकस्थळी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
अशोक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिंचाळा
वडवणी तालुक्यातील अशोक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रा. सर्जेराव काळे, मुख्याध्यापक बी.आर. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. उपप्राचार्य सुशांत काळे, उपप्राचार्य सुधाकर पटाईत, तुकाराम आवारे, वैजीनाथ गडदे, अनिल खळगे, प्रा. कुमुदिनी कुरवडे, सचिन सलगर, जी.आर. जोशी, जी.आर. तेलंग, बडे, पांडुरंग कोळपे, डोंगरे, गोरख चोरमले, अंकुश शिंगाडे आदी प्राध्यापकांची यावेळी उपस्थिती होती. विशाल तरटे, राधा शिंदे, स्मिता तिडके, सीमा तिडके, सुनीता बडे, पूजा कोकनार, प्रशांत वांडेकर आदी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पारिश्रम घेतले. सूत्रसंचालन वर्षा कोळपे तर आभार राधा शिंदे हिने मानले.
स्वामी समर्थ केंद्र, सहयोगनगर बीड
शहरातील सहयोगनगर भागातील स्वामी समर्थ सेवा केंद्रात शनिवारी दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. भाविकांची गर्दी पाहता चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळच्या वेळी आरती झाल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
मानूरमठ, बीड
शहरातील मानूर मठ येथील पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम घेण्यात आले. रूद्राभिषेक, महाआरती करून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. रवींद्र स्वामी, महालिंग स्वामी, महारूद्र स्वामी, किशोर स्वामी, ओंकार शेटे, सचिन शहागडकर, रामेश्वर कानडे, अनिल मिटकरी, रामेश्वर कानडे, बळीराम मिटकरी, विश्वनाथ कळमकर, वीरभद्र कोयटे, पशुपती शेटे, सुरेश कानडे, शांतलिंग कळंबकर, अनिल परंडकर, गणेश येळंबकर, गणेश कळंबकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
चंपावती इंग्लिश स्कूल, बीड
येथील चंपावती इंग्लिश स्कूलमध्येही कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अरविंद गंधे हे होते. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी द्रोणाचार्य, एकलव्य गुरूशिष्याचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर केली. विद्यार्थ्यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका जाजू हिने केले. तर पूनम गंभीर हिने आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही.यू. राजहंस, व्ही.एम. कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पावनधाम, औरंगपूर
केज तालुक्यातील औरंगपूर येथील जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम येथे गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूपूजन, गुरूदीक्षा महोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवर्य महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महादेव महाराज राऊत यांचे यावेळी कीर्तन झाले. शंकरराव उबाळे, कल्याणराव शिनगारे, पंडितराव सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

Web Title: In the district, Gurupournima is excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.