कोरोनाला हरविण्यासाठीजिल्ह्याला मिळाले २५ हजार डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:02 AM2021-04-22T04:02:01+5:302021-04-22T04:02:01+5:30

औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयास मंगळवारी रात्री कोविशिल्ड लसींचे ४८ हजार डोस मिळाले. या लसींचे बुधवारी सकाळी युद्धपातळीवर ...

The district got 25,000 doses to defeat Corona | कोरोनाला हरविण्यासाठीजिल्ह्याला मिळाले २५ हजार डोस

कोरोनाला हरविण्यासाठीजिल्ह्याला मिळाले २५ हजार डोस

googlenewsNext

औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयास मंगळवारी रात्री कोविशिल्ड लसींचे ४८ हजार डोस मिळाले. या लसींचे बुधवारी सकाळी युद्धपातळीवर वितरण करण्यात आले. यात मनपाला १५ हजार ९०० आणि ग्रामीण भागासाठी १० हजार डोस देण्यात आले. त्यामुळे किमान काही दिवस लसीकरण सुरळीत राहणार आहे.

लस प्राप्त झाल्यामुळे बुधवारी लसीकरण सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. आगामी आठवड्यात आणखी लस मिळण्याची आशा आहे. लस संपल्यामुळे महापालिकेला लसीकरण मोहीम गुंडाळावी लागली. मंगळवारी सायंकाळपर्यंत औरंगाबादेत ५ हजार लसींचा साठा होता. हा साठा दोन दिवस पुरेल इतका आहे. लसींचा पुरवठा कधी होणार, याविषयी काहीही सांगता येणार नाही, अशी परिस्थिती होती. परंतु औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयास रात्री ४८ हजार डोस मिळाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला. औरंगाबाद जिल्ह्यासह जालना आणि परभणी जिल्ह्याला लस देण्यात आली. प्राप्त झालेल्या लसींचे वितरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे यांनी दिली. सुटीचा दिवस असताना लस वितरणासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

असे झाले लसींचे वितरण

- औरंगाबाद मनपा - १५, ९०० डोस

- औरंगाबाद ग्रामीण (डीएचओ) - १०,००० डोस

- जालना - १२, ९०० डोस

-परभणी - ९,२०० डोस

Web Title: The district got 25,000 doses to defeat Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.