मराठा आरक्षणासाठी जिल्हाकचेरीवर मोर्चा

By Admin | Updated: April 26, 2016 23:46 IST2016-04-26T23:34:03+5:302016-04-26T23:46:00+5:30

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला़

District Front for Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी जिल्हाकचेरीवर मोर्चा

मराठा आरक्षणासाठी जिल्हाकचेरीवर मोर्चा

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चात मातोश्री प्रतिष्ठानसह विविध मराठा समाज संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते़
मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान नेवल पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला होता़ सदर आंदोलनास मालेगाव रस्त्यावरील राजमाता जिजाऊ चौक येथून प्रारंभ झाला़ मोर्चासाठी बॅण्डबाजा लावून सर्वांचे लक्ष वेधले़ तरोडानाका, वर्कशॉप, भाग्यनगरमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ मोर्चात सहभागी मराठा कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणा दिल्या़ जय जिजाऊ़़़जय शिवराय़़़, आरक्षण आमच्या हक्काचे़़़अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता़
आंदोलनात गिरीष जाधव, तानाजी पाटील, माधव ताटे, सुरेश ठाकरे, जनार्दन कल्याणकर, ज्ञानेश्वर कल्याणकर, गंगाधर बोकारे पाटील, छगन सांगोळे, कैलास कदम, अनिल कल्याणकर आदीसह शेकडो कार्यकर्ते आणि महिलांनी सहभाग नोंदवला़ दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्यामार्फत शासनास निवेदन देण्यात आले़ मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला़ (प्रतिनिधी)

Web Title: District Front for Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.