जिल्हा दुष्काळाच्या छायेत
By Admin | Updated: August 13, 2014 01:07 IST2014-08-13T00:43:07+5:302014-08-13T01:07:02+5:30
लातूर : जिल्ह्यात १ लाख ९२ हजार ३०० सरासरी क्षेत्रापेक्षा तीप्पट क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली़ उशीरा झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीन आलेच नाही़

जिल्हा दुष्काळाच्या छायेत
लातूर : जिल्ह्यात १ लाख ९२ हजार ३०० सरासरी क्षेत्रापेक्षा तीप्पट क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली़ उशीरा झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीन आलेच नाही़ तर सोयाबीन उगवलेल्या ठिकाणी सोयाबीनवर आळ्यांचा प्रादुर्भाव झाला़ त्यामुळे सोयाबीनचे पीक दुहेरी संकटात सापडले आहे़ परिणामी बळीराजा खचला असल्याचे चित्र दिसून येत आहे़
जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पाच लाख ५६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रांपैकी १ लाख ९२ हजार ३०० या सोयाबीनच्या क्षेत्रापेक्षा तीप्पट क्षेत्रावर पेरणी झाली़ यामध्ये जिल्ह्यातील काही क्षेत्रावर सोयाबीनची उगवन झाली नाही तर काही क्षेत्रावरील सोयाबीनच्या पिकावर किडीआळीचा प्रादुर्भाव झाला़ त्यामुळे शेतकऱ्याला दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे़ त्यातच पावसाने पुन्हा उघडिप दिल्यामुळे सोयाबीनसह इतर पिके सुकू लागली आहेत़ ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे ते शेतकरी स्प्रिंकलरव्दारे पाणी देऊन सोयाबीनच्या पिक ंना जगवित आहेत़ तर काही शेतकऱ्याकडे पाण्याची सोय नसल्याने त्याची पिके मात्र अपुऱ्या पावसाअभावी सुकू लागली आहेत त्यामुळे अनंत आडचणीला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे़