जिल्ह्यात धरणे,रास्तारोको,मोर्चा
By Admin | Updated: August 14, 2014 02:09 IST2014-08-14T02:00:00+5:302014-08-14T02:09:39+5:30
ाांदेड : विविध मागण्यांसाठी धरणे, रास्तारोको, मोर्चा आदी आंदोलने विविध संघटनांच्या वतीने केली जात आहेत.

जिल्ह्यात धरणे,रास्तारोको,मोर्चा
ाांदेड : विविध मागण्यांसाठी धरणे, रास्तारोको, मोर्चा आदी आंदोलने विविध संघटनांच्या वतीने केली जात आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या पदरात काही तरी पडावे, अशी रास्त अपेक्षा आंदोलनकर्त्यांची आहे.
मुदखेड : गोर सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी १३ आॅगस्ट रोजी मुदखेड तहसीलवर मोर्चा काढण्यात आला़
गोर भाषेला बोलीभाषेचा दर्जा द्यावा, कै़वसंतराव नाईक यांचा पुतळा नांदेड येथे त्वरित उभारावा आदी मागण्या मुदखेड तहसीलचे नायब तहसीलदार सामरेड्डी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला़ यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड़ प्रदीप राठोड, जिल्हा सचिव पप्पू चव्हाण, तालुका अध्यक्ष श्याम चव्हाण, गोर सिकवाडीचे संयोजक उत्तम चव्हाण, शहर अध्यक्ष गोपाल राठोड, हिरामण राठोड, धोंडू राठोड, राजेश आडे, अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, कुलभूषण राठोड, सुरेश चव्हाण, गोविंद राठोड, बालाजी जाधव, मयूर चव्हाण, संतोष राठोड, विकी चव्हाण, बालाजी राठोड, प्रवीण पवार, प्रमोद राठोड, सुरेंद्र राठोड, मनोज चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, राम जाधव, इंदुबाई चव्हाण, श्रीमती भुरीबाई राठोड आदी सहभागी होते़
हिमायतनगरात धरणे आंदोलन
हिमायतनगर : तालुका कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसापासून धरणे आंदोलन सुरु केले, अशी माहिती कृषी पर्यवेक्षक जी.एस. पवार यांनी दिली. आंदोलनात तालुका कृषी अधिकारी दावलबाजे, मंडळ कृषी अधिकारी जाधव, कृषीे पर्यवेक्षक लखमोड, जी.एस. पवार, कृषी सहाय्यक काकडे, खुपसी, काळे, बारसे, लोखंडे, पैलवाड, राठोड, शिलमवाड, बेहरेमॅडम, मांझळकर, सूर्यवंशी आदी सहभागी झाले आहेत.
गोरसेनेचा मोर्चा
माहूर : बंजारा समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी १६ आॅगस्ट रोजी किनवट उपविभागीय कार्यालयावर माहूर तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची गोरसेनेचे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जाधव यांनी दिली.
धर्माबादेत धरणे
धर्माबाद : विविध मागण्यांसाठी धर्माबाद कृषी विभागाने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ मागण्या पूर्ण होईपर्यंत तीन दिवस धरणे आंदोलन करण्यात येत असून १४ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही दिला आहे़ तालुका कृषी अधिकारी एच़ बी़ सुरकुटवार, मंडळ कृषी अधिकारी एम़ व्ही़ गोंड, कृषी पर्यवेक्षक एस़ व्ही़ उप्पलवाड, आऱ आऱ भिसे, कृषी सहाय्यक आऱ एम़ नरसीकर, डी़ जी़ लांडगे, सी़ एस़ डोईवाडे, एस़ एस़ शिंदे, एस़ एल़ डोपलवार, बी़ बी़ गजेवाड, व्ही़ व्ही़ एनलोड, कृषी अधिकारी जी़ जी़ एनगोंड आदी कर्मचारी सहभागी होते़(वार्ताहर)