जिल्ह्यात कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:04 IST2021-07-09T04:04:46+5:302021-07-09T04:04:46+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. अवघ्या पाच दिवसांत गुरुवारी रोज निदान होणाऱ्या ...

जिल्ह्यात कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. अवघ्या पाच दिवसांत गुरुवारी रोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या २५ वरून ७१ झाली. ही तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा तर नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्स आणि वारंवार हात धुणे, या त्रिसूत्रीचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ७१ रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील २१, ग्रामीण भागातील ५० रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत शहरातील एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ग्रामीण भागातील तीन आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ४७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील ४२० रुग्णांवर, तर शहरात अवघ्या ५९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात १ जुलै रोजी ९३ रुग्णांची भर पडली होती. परंतु, त्यानंतर दररोजची रुग्णसंख्या ५० च्या खाली होती. त्यामुळे दिलासा व्यक्त करण्यात येत होता. मात्र, गुरुवारी पुन्हा एकदा रुग्णसंख्या ५० च्या वर गेली आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ५९९ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ६७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ११ आणि ग्रामीण भागातील ४१ अशा ५२ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना वाहेगाव, गंगापूर येथील ५२ वर्षीय पुरुष, मांळुजा, गंगापूर येथील ९७ वर्षीय पुरुष, पैठण येथील ६२ वर्षीय महिला आणि अहमदनगर जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
गोल्डन सिटी, पैठण रोड १, सन्मित्र कॉलनी, औरंगपुरा १, छावणी १, हर्सूल टी-पाॅइंट १, हर्सूल १, एन-३, ठाकरेनगर ३, न्यू एस.टी. कॉलनी ३, औरंगाबाद १, एन-६, सिडको, आविष्कार कॉलनी १, चौधरी कॉलनी १, मुकुंदनगर, मुकुंदवाडी १, देवळाई २, चिकलठाणा १, अन्य ३.
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद १, गंगापूर ४, कन्नड ७, सिल्लोड १, वैजापूर १३, पैठण २४.
-----
चौकट...
जिल्ह्यात रोजच्या नव्या रुग्णांची स्थिती
जिल्ह्यात रोजच्या नव्या रुग्णांची स्थिती
तारीख ---- रुग्णसंख्या
४ जुलै- २५
५ जुलै- ३८
६ जुलै- ४३
७ जुलै- ४८
८ जुलै- ७१