सातारा-देवळाई न.प.ला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By Admin | Updated: September 11, 2014 01:11 IST2014-09-11T00:44:30+5:302014-09-11T01:11:19+5:30
औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषद व तिच्यापुढील आव्हानांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी भेट देऊन अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली.

सातारा-देवळाई न.प.ला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषद व तिच्यापुढील आव्हानांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी भेट देऊन अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली.
२८ आॅगस्ट रोजी सातारा- देवळाई नगर परिषदेची घोषणा झाली अन् दोन दिवसांपूर्वी तहसीलदार विजय राऊत यांच्याकडे नगर परिषदेचा पदभार सोपविण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, दोन्ही ग्रामपंचायतींमधील वसुली, नगर परिषदेसमोर पाणी, रस्ते, वीज, ड्रेनेज, कचरा सफाई, औषध फवारणी इत्यादीसह अनेक आव्हाने उभी आहेत. एक लाखाकडे लोकसंख्येचा आकडा झपाट्याने सरकत असून मालमत्तेत दिवसेंदिवस भर पडत आहे. सुनियोजित नगर परिषदेचा आढावा जाणून घेऊन मालमत्ता कर वसुली, सफाई, औषध फवारणीसह पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांविषयी अधिक सूचना दिल्या. तिजोरीतील आकडा आणि कर्मचाऱ्यांचा पगार इत्यादीवर अधिक मंथन करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे प्रशासक विजय राऊत यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
नगर परिषदेच्या घोषणेनंतर पंचायत समितीच्या सदस्य चंद्रकलाबाई पवार यांचे पद मुक्त झाले आहे, अशी नोटीस आज पवार यांना मिळाली आहे. पद गेल्याचे कुठलेही दु:ख नाही. उलट सातारा- देवळाईचे पाणी, रस्ते, ड्रेनेज हे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत; परंतु गट नं. १२० ते २७ पर्यंतचे गट ना मनपात, ना नगर परिषदेत घेण्यात आले आहेत.