कोरोना रुग्णांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जिल्हाधिकाऱ्यांनी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:02 IST2021-04-12T04:02:27+5:302021-04-12T04:02:27+5:30
मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट, कोविड वॉर्ड, लॅब इत्यादींची पाहणी केली. सेंटरमधील रूग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून रुग्णालयातील ...

कोरोना रुग्णांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जिल्हाधिकाऱ्यांनी !
मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट, कोविड वॉर्ड, लॅब इत्यादींची पाहणी केली. सेंटरमधील रूग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून रुग्णालयातील अडीअडचणी जाणून घेतल्या. रुग्णांशी संवाद साधल्यानंतर सेंटरमधील औषधी साठा व इतर आवश्यक साधनसामग्रीचीही विचारपूस केली. औषधी साठ्याचा अभिलेख अद्ययावत ठेवण्याबाबत सूचना केल्या. यावेळी मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, भोंबे आदींसह कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स आदींची उपस्थिती होती.
जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट आणि ऑक्सिजन उपलब्धतेबाबत ऑक्सिजन पुरवठादारांशी चव्हाण यांनी संवाद साधला. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांना प्लांट, ऑक्सिजन उपलब्धतेबाबत सूचना केल्या. तसेच परिसरातील बायोमेडिकल वेस्टची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, परिसरात स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
घाटी येथील जुन्या मेडिसीन इमारतीचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी नवीन कोविड केअर सेंटर उभारण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. याठिकाणची पाहणी देखील चव्हाण यांनी केली. प्रत्यक्ष भेट देऊन कोविड केअर सेंटरमध्ये गुणवत्तापूर्ण साधनसामग्री वापरण्याबाबत आणि एक्झॉस्ट फॅन बदलून मॉडिक्युलेट एक्झॉस्ट फॅन बसवण्याच्या सूचना त्यांनी अभियंत्यांना केल्या.