अधिकारी, नागरिकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:05 IST2021-04-04T04:05:47+5:302021-04-04T04:05:47+5:30
आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, लसीकरणावर अधिक भर द्यावा, अशा सूचना देखील प्रशासकीय, वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. फुलंब्री तालुक्यामध्ये कोरोनाचे ...

अधिकारी, नागरिकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद
आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, लसीकरणावर अधिक भर द्यावा, अशा सूचना देखील प्रशासकीय, वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. फुलंब्री तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी संशयित रुग्णांच्या कोरोना चाचण्या कराव्यात, जनजागृती करून लसीकरण वाढवावे, असे फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालय व कोविड केअर सेंटर येथे पाहणी करताना त्यांनी सांगितले.
फुलंब्री यांनी ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सुविधांची त्यांनी पाहणी केली. तालुक्यातील रुग्णांना तालुक्यातच उपचार मिळेल, यादृष्टीने प्रयत्न करावेत, असा आग्रह त्यांनी धरला.
फुलंब्रीतील शासकीय विश्रामगृहामध्ये कोविड केअर सेंटर सुरू करावे. फुलंब्री तालुक्यात १६ गावांमध्ये पाचपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. अशा ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करण्याच्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग युद्धपातळीवर वाढवावे, अशा सूचनाही चव्हाण यांनी केल्या.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी पूजा पाटील, तहसीलदार डॉ. शीतल राजपूत, नगराध्यक्ष सुहास शिरसाट, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश साबळे, नायब तहसीलदार प्रशांत काळे, मुख्याधिकारी नंदा गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे, योगेश मिसाळ, तलाठी अजित गावडे आदींची उपस्थिती होती.
फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी रुग्णांशी संवाद साधला. खुलताबाद तालुक्यातील भद्रा मारोती मंदिर, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, भक्त निवास कोविड केअर सेंटर येथे चव्हाण यांनी भेट देऊन कोरोना परिस्थिती जाणून घेत आवश्यक त्या सूचना केल्या.