केळगावात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली शांतता बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:30+5:302020-12-17T04:28:30+5:30

केळगावात ११ तारखेला जो प्रकार घडला, तो दुर्देवी असून यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्या. पोलीस ...

District Collector held a peace meeting in Kelgaon | केळगावात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली शांतता बैठक

केळगावात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली शांतता बैठक

केळगावात ११ तारखेला जो प्रकार घडला, तो दुर्देवी असून यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्या. पोलीस व प्रशासन आपल्या सेवेसाठी आहे. एकमेकांना सहकार्य करा, असे सांगून त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी घडलेला सविस्तर वृत्तांत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर गावातील नागरिकांनी याप्रकरणात गावातील तरुणांवर पोलिसांनी दाखल केलेेले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी,उपविभागीय जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत, डॉ. संजय राजपूत, भागवत मोरे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

फोटो : केळगाव येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची शांतताबैठक घेतली. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व गावकरी.

Web Title: District Collector held a peace meeting in Kelgaon