आर्थिक मदतीसाठी जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:10 IST2017-09-01T00:10:19+5:302017-09-01T00:10:19+5:30
शहरात २० आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरुन संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. त्यांना आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा कचेरीवर श्रावस्तीनगर, सादतनगर, नारायणनगर आदी भागांतील नागरिकांनी मोर्चा काढला.

आर्थिक मदतीसाठी जिल्हा कचेरीवर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शहरात २० आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरुन संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. त्यांना आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा कचेरीवर श्रावस्तीनगर, सादतनगर, नारायणनगर आदी भागांतील नागरिकांनी मोर्चा काढला.
शहरात २० आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील घरांमध्ये पाणी शिरले होते. चुन्ना नाल्याला आलेल्या पुराचे पाणी श्रावस्तीनगर, सादतनगर, तेहरानगर, राऊत कॉलनी, शिल्पकारनगर, नारायणनगर, नवीन श्रावस्तीनगर, सावित्रीबाई फुलेनगर, जयभीमनगर आदी भागांतील नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे त्यांचे संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, मौल्यवान वस्तू वाहून गेल्या. यामुळे हजारो नागरिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबीची दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. आजही अनेक नागरिक प्रशासनाने केलेल्या निवाºयामध्ये आहेत. या भागातील नागरिकांना त्वरित मदत द्यावी, बेघरांना घरे द्यावीत, येथील नागरिकांचे पुनर्वसन करावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अशोक काकांडीकर, पद्माकर सोनकांबळे, साहेबराव चौदंते, भीमराव क्षीरसागर, रवी सोनसळे, अ.रईस, युनसू आदींची उपस्थिती होती.