जिल्हा बँकेची निवडणूक २१ मार्च रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:05 IST2021-02-16T04:05:56+5:302021-02-16T04:05:56+5:30

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी २१ मार्च रोजी मतदान होणार आहे. कोरोनामुळे या बँकेच्या ...

District Bank Election on 21st March | जिल्हा बँकेची निवडणूक २१ मार्च रोजी

जिल्हा बँकेची निवडणूक २१ मार्च रोजी

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी २१ मार्च रोजी मतदान होणार आहे. कोरोनामुळे या बँकेच्या संचालक मंडळास तीन वेळा मुदतवाढ मिळाली.

२१ मार्च रोजी सकाळी आठ ते चार या वेळेत २१ संचालकांसाठी मतदान घेण्यात येईल. २२ मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

१५ फेब्रुवारीपासून सकाळी ११ वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. २२ फेब्रुवारीपर्यंत ही नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. याच दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रांची यादी प्रकाशित करण्यात येईल. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता नामनिर्देशनपत्रांची सूची जाहीर होईल. २४ फेब्रुवारी ते दहा मार्च या काळात दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. १२ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता चिन्हांचे वाटप होईल. २१ मार्च रोजी सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होईल. २२ मार्च रोजी मतमोजणी होईल.

Web Title: District Bank Election on 21st March