जिल्हा वकील, आय.आय.ए. संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:56 IST2018-03-05T00:54:07+5:302018-03-05T00:56:25+5:30
एमजीएम क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत उदय पांडे याच्या घणाघाती शतकी खेळीच्या बळावर जिल्हा वकील संघाने वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ संघावर १०७ धावांनी दणदणीत विजय मिळविला. दुसºया लढतीत शुभम हरकळच्या कामगिरीच्या बळावर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट (आय.आय. ए.) संघाने वैद्यकीय प्रतिनिधी ‘ई’ संघावर ८ गडी राखून मात केली.

जिल्हा वकील, आय.आय.ए. संघ विजयी
औरंगाबाद : एमजीएम क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत उदय पांडे याच्या घणाघाती शतकी खेळीच्या बळावर जिल्हा वकील संघाने वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ संघावर १०७ धावांनी दणदणीत विजय मिळविला. दुसºया लढतीत शुभम हरकळच्या कामगिरीच्या बळावर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट (आय.आय. ए.) संघाने वैद्यकीय प्रतिनिधी ‘ई’ संघावर ८ गडी राखून मात केली.
उदय पांडेने ७१ चेंडूंत ५ टोलेजंग षटकार व १४ चौकारांसह केलेल्या १३५ धावांच्या स्फोटक खेळीच्या बळावर जिल्हा वकील संघाने २० षटकांत ४ बाद २१२ धावा ठोकल्या. नीलेश जाधवने नाबाद २६ व अभिलेष पवारने १४ धावा केल्या. प्रत्युत्तरात वैद्यकीय प्रतिनिधी संघ ७ बाद १०५ धावाच करू शकला. त्यांच्याकडून दीपक सूर्यवंशीने २६ धावा केल्या. वकील संघाकडून खालेद सिद्दीकी व दीपक मानोरकर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
दुसºया लढतीत वैद्यकीय प्रतिनिधी ‘ई’ संघाने २० षटकांत ८ बाद १४१ धावा केल्या. त्यांच्याकडून मोहंमद अय्याजने ३५ धावा केल्या. आय.आय. ए. संघाकडून अमोल खरातने ३६ धावांत ३ तर सुनील भालेने २० धावांत २ बळी घेतले. प्रत्युत्तरात आय.आय.ए. संघाने विजयी लक्ष्य १४.५ षटकांत २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून शुभम हरकळने ६ चौकार, ३ षटकारांसह ५२ व अमोल पवारने ५ चौकार व एका षटकारासह ४९ धावा केल्या. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन एमजीएमचे कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संजय चिंचोलीकर, उद्धव भवलकर, दामोधर मानकापे यांच्यासह अनंत नेरळकर, लक्ष्मण साक्रुडकर, प्रभुलाल पटेल, मनिंदरसिंग कानसा, लक्ष्मीकांत मेगदे, अशोक सातपुते आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गंगाधर शेवाळे, राजेश्वर सिद्धेश्वर, उदय बक्षी, सागर वैद्य, राकेश सूर्यवंशी, संदीप भंडारी, अजय देशपांडे आदी परिश्रम घेत आहेत.