जिल्हा प्रशासन लागले तयारीला

By Admin | Updated: September 10, 2014 00:00 IST2014-09-09T23:38:33+5:302014-09-10T00:00:16+5:30

परभणी : जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

District administration started preparations | जिल्हा प्रशासन लागले तयारीला

जिल्हा प्रशासन लागले तयारीला

परभणी : जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या उपस्थितीत कर्मचारी-अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पथकांची स्थापना करण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ही निवडणूक यशस्वी पार पाडण्याची मोठी जबाबदारी प्रशासनावर असते. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणेनेही तयारी सुरू केली असून, त्यापार्श्वभूमीवर ८ सप्टेंबर रोजी जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक प्रशिक्षण शिबीर पार पडले.
फिरते पथक, स्थिर निगराणी पथक, व्हिडीओ सर्व्हिलन्स पथक, व्हिडीओ पडताळणी पथक, खर्च संनियंत्रण पथक या संदर्भातील प्रशिक्षण नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले. उमेदवारांच्या खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी विधानसभा मतदार संघनिहाय एक शासकीय अधिकारी व एक व्हिडीओग्राफर यांचे पथक कार्यान्वित केले जाणार आहे. या पथकाने व्हिडीओ संनियंत्रण पथकाकडून प्राप्त झालेल्या चित्रफिती तपासणे, त्यातील निवडणूक खर्चात घेण्यासाठी संबंधित पथकाने माहिती उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सहायक लेखाधिकारी व मदतनीस कर्मचारी यांचे पथक कार्यान्वित करण्यात येणार आहे.
उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने व्हिडीओ पुराव्याचे अंकेक्षण केले जाणार आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदार संघात तीन किंवा आवश्यकतेनुसार त्यापेक्षा जास्त भरारी पथके स्थापन केली जाणार आहेत. त्यात एक वरिष्ठ कार्यकारी दंडाधिकारी हे पथकप्रमुख राहतील. एक वरिष्ठ पोलिस अधिकारी, तीन ते चार सशस्त्र पोलिस व एक व्हिडीओग्राफर असेल. उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागरुकता गटही स्थापन केले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीमध्ये नाव नोंदणी करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्या मतदाराचे नाव यादीत नाही, अशा मतदारांनी नमुना ६ अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा मतदार मदत केंद्रात भरावा. विधानसभेसाठी उमेदवारांना अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकांच्या १० दिवस अगोदरपर्यंत मतदारयादीत नावनोंदणी करता येईल.

Web Title: District administration started preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.