‘स्वाईन फ्लू’ला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क
By Admin | Updated: February 5, 2015 00:54 IST2015-02-05T00:43:32+5:302015-02-05T00:54:24+5:30
लातूर : जिल्ह्यात सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली असून, सदृश स्वाईन फ्लू आजाराचेही रुग्ण आढळत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार

‘स्वाईन फ्लू’ला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क
लातूर : जिल्ह्यात सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली असून, सदृश स्वाईन फ्लू आजाराचेही रुग्ण आढळत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेटेड वॉर्डात सध्या तीन रुग्ण संशयित असून, त्यांच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. शिवाय, कालच एका रुग्णाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शहरातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांची बैठक घेऊन स्वाईन फ्लूच्या रोगाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून काय केले पाहिजे, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक व प्राचार्य यांची मंगळवारी आयएमए हॉल येथे बैठक घेण्यात आली़ याबैठकीत मुख्याध्यपक व शिक्षक यांना स्वाईन फ्लू रोगाबाबत माहिती देवून शाळा, कॉलेज यांच्या करिता शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांची महिती देण्यात आली़
सर्दी, ताप खोकला असल्यास विद्यार्थ्यांना शाळत न येता घरीच विश्रांती घेण्याची सूचना देण्याबाबत व तसेच याप्रमाणे पालकांना देखील शाालेय स्तरावरुन कळविण्याबाबत सूचना देण्यात आली़ वर्गशिक्षकांनी दररोज आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांपैकी कोणाला सर्दी ताप आहे का, याची काटेकोर पाहणी करावी. तसे निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थ्यांस घरी विश्रांतीचा सल्ला द्यावा. सात दिवसानंतरच त्याला शाळेत येण्यासंदर्भात सुचित करण्यात यावे, असे या बैठकीत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)