जिल्ह्यात १६२ मि.मी. पावसाची झाली नोंद

By Admin | Updated: July 6, 2016 23:45 IST2016-07-06T23:34:16+5:302016-07-06T23:45:33+5:30

जालना : जिल्ह्यात अद्यापर्यंत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. सहा जुलै अखेर १६२. २५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

District 162 mm Rainfall Record | जिल्ह्यात १६२ मि.मी. पावसाची झाली नोंद

जिल्ह्यात १६२ मि.मी. पावसाची झाली नोंद


जालना : जिल्ह्यात अद्यापर्यंत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. सहा जुलै अखेर १६२. २५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जून महिन्यातही दमदार पाऊस झाला नाही. पेरणीसाठी तसेच पिकांसाठी हा पाऊस अनुकूल असला तरी जलसाठ्यांत ठणठणाट आहे. यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे. ६ जुलै रोजी जिल्ह्यात २१. ८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. १ जून ते ६ जुलै अखेर जालना १८६.८३, बदनापूर- २०२.९७, भोकरदन- १८१. ८५, जाफराबाद- १६४, परतूर- १६६.२२, मंठा- १५९.२९, अंबड- १५९.६०, घनसावंगी- १५६.५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरी १७२.१७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: District 162 mm Rainfall Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.