अंबाजोगाईत आरक्षण प्रमाणपत्रांचे वाटप
By Admin | Updated: July 24, 2014 00:07 IST2014-07-23T23:29:24+5:302014-07-24T00:07:26+5:30
अंबाजोगाई: महाराष्ट्र शासनाने नुकताच मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केले आहे.

अंबाजोगाईत आरक्षण प्रमाणपत्रांचे वाटप
अंबाजोगाई: महाराष्ट्र शासनाने नुकताच मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केले आहे. या दोन्ही समाजातील विद्यार्थ्यांना बुधवारी दुपारी उपजिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. शासनआदेश निघाल्यानंतर जलदगतीने प्रमाणपत्र वितरणाचा अंबाजोगाईचा प्रथम क्रमांक असल्याचे समजते.
मराठा व मुस्लिम समाजाला शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर अधिसूचना प्राप्त होताच अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, तहसीलदार राहुल पाटील यांनी बुधवारी दुपारी मराठा व मुस्लिम समाजातील लाभार्थ्यांना आरक्षण प्रमाणपत्राचे वितरण केले. यावेळी मुस्लिम समाजाचे प्रमाणपत्र शेख मुबारक शेख शहाबुद्दीन तर मराठा समाजाचे प्रताप दत्तात्रय शिंदे, रा. भारज, अंकिता व्यंकट रोडगे, रा. सुर्डी ता. केज, गणेश उद्धव इंगोले, आडस यांना वितरीत करण्यात आले. यावेळी आ. पृथ्वीराज साठे, माजी उपनगराध्यक्ष शेख रहिम शेख रज्जाक, शेख रौफ, अनिल पिंपळे,दत्तात्रय दमकोंडवार यांची उपस्थिती होती. यावेळी उपविभागीय अधिकारी मंंदार वैद्य यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)