बौद्ध पौर्णिमेनिमित्त खीर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:04 IST2021-05-27T04:04:27+5:302021-05-27T04:04:27+5:30

औरंगाबाद : बौद्ध पौर्णिमेनिमित्त राष्ट्रवादी भीम सेनेतर्फे जुनी पोलीस कॉलनी, सिडको येथे खीर दानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोरोनाचे ...

Distribution of Kheer on the occasion of Buddhist full moon | बौद्ध पौर्णिमेनिमित्त खीर वाटप

बौद्ध पौर्णिमेनिमित्त खीर वाटप

औरंगाबाद : बौद्ध पौर्णिमेनिमित्त राष्ट्रवादी भीम सेनेतर्फे जुनी पोलीस कॉलनी, सिडको येथे खीर दानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोरोनाचे नियम पाळण्यात आले. सर्व बौद्ध उपासकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल पाखरे, राजेश बुंदिले, गजानन देशमुख, जगदीश कोडामंगल, विकी वाघुले, शहर उपाध्यक्ष बंटी मोहर, रेखा पाटील, आदी उपस्थित होते.

बुध्द लेणी विहारात शिधादान

औरंगाबाद : बौद्ध पोर्णिमोनिमित्त बौद्ध लेणी विहारात भिक्खू संघाला महाराष्ट्र अभियंता सेनेचे प्रवीण जाधव, राजू आमराव यांच्या हस्ते शिधादान करण्यात आले. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी गंगावणे, विजय मगरे, सखाहरी बनकर, आदी उपस्थित होते.

शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वे स्थानक, जयभवानी नगर येथील शिवभोजन केंद्राचे उद्घाटन विधानसभा संघटक राजू वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, दिग्विजय शेरखाने, हिम्मत पटेल, दामोधर शिंदे, पद्मा तुपे, अशोक गोरे, आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of Kheer on the occasion of Buddhist full moon