बदनापूर येथे चारशे लाभार्थ्यांना एक कोटी रुपयांचे धनादेश वाटप
By Admin | Updated: September 8, 2014 00:51 IST2014-09-08T00:14:09+5:302014-09-08T00:51:35+5:30
बदनापूर : अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या वतीने बदनापूर येथे एक कोटी रूपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले तालुक्यात मातंग समाजाच्या विकासासाठी अण्णा भाऊ साठे

बदनापूर येथे चारशे लाभार्थ्यांना एक कोटी रुपयांचे धनादेश वाटप
बदनापूर : अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या वतीने बदनापूर येथे एक कोटी रूपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले तालुक्यात मातंग समाजाच्या विकासासाठी अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने चारशे महिला लाभार्थ्यांना एक कोटी रूपये कर्ज स्वरूपात मंजुर करण्यात आले आहे.
या आर्थिक मदतीचे धनादेशाचे वाटप दि ७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राकॉचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, बबलू चौधरी, जि.प. सदस्य बाबासाहेब सोनवणे, बाळासाहेब वाकुळणीकर,सुभाषराव बोडखे, पांडुरंग जऱ्हाड, पद्माकर पडुळ, विष्णू कोल्हे, शत्रुघ्न बरांडे, सुनील चौधरी, राम सिरसाठ, शेख युनूस आदींसह अनेक पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री टोपे म्हणाले की राकॉ नेहमीच विकासाला प्राधान्य देते.
या मतदार संघात जर राकॉचा आमदार झाला तर यापेक्षाही जास्त विकास या मतदार संघाचा होईल असा विश्वास व्यक्त केला.