३०० वीजग्राहकांचा पुरवठा खंडित
By Admin | Updated: March 11, 2017 00:29 IST2017-03-11T00:27:29+5:302017-03-11T00:29:45+5:30
जालना : थकबाकीदार वीज ग्राहकांचा पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात येत आहे.

३०० वीजग्राहकांचा पुरवठा खंडित
जालना : थकबाकीदार वीज ग्राहकांचा पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात येत आहे. दोन दिवसांत राबविण्यात आलेल्या मोहिमेत शहर व जिल्ह्यातील मिळून ३०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला .
तीन महिन्यांपासून दोन हजार रूपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदारांविरोधात तीव्र मोहीम राबविली जात आहे. यात दोन्ही जिल्ह्यात अनेक वेळा सूचना, विनंत्या, नोटिसा बजावूनही दाद न देणाऱ्या वीज ग्राहकांचा १ कोटी १९ लाख २ हजार रूपये थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करून मीटर व वायर जप्त करण्यात आले. तर १५५० थकबाकीदार वीज ग्राहकांकडून ९२ लाख २५ हजार रूपये वीज बिल वसूल करण्यात आले.
धडक मोहिमेत १४१ वीज ग्राहकांकडून वीज बिलाचे ५ लाख ३२ हजार रूपयांची थकबाकी वसूल करण्यात आली. वीज बिलाच्या थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरण जबाबदार राहणार नाही. वीज बिलासंबंधि काही तक्रार, शंका असल्यास जवळच्या महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाशी संपर्क करावा. वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. सुजाण नागरिकांनी आकडे टाकून, रिमोटचा वापर करून व इतर मागार्ने अनधिकृत विजेचा वापर करू नये. अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. या धडक मोहिमेत वीज चोरी करताना आढळून आल्यास संबंधितांवर विद्युत कायदा २००३ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. वीज ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले.