२० गावांचा विद्यूत पुरवठा होणार खंडित

By Admin | Updated: September 19, 2014 01:01 IST2014-09-19T00:27:11+5:302014-09-19T01:01:15+5:30

कोळगाव : गेवराई तालुक्यातील मादळमोही ३३ केव्ही वीज केंद्र्रांतर्गत २० गावांनी महावितरण कंपनीकडे वीज देयके भरले नसल्याने या गावांचा विजपुरवठा तात्काळ खंडित करण्याचा आदेश

The distribution of 20 villages will be dissolved | २० गावांचा विद्यूत पुरवठा होणार खंडित

२० गावांचा विद्यूत पुरवठा होणार खंडित


कोळगाव : गेवराई तालुक्यातील मादळमोही ३३ केव्ही वीज केंद्र्रांतर्गत २० गावांनी महावितरण कंपनीकडे वीज देयके भरले नसल्याने या गावांचा विजपुरवठा तात्काळ खंडित करण्याचा आदेश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढले आहेत. या गावांची शून्य वसुली आहे. तात्काळ थकित देयके न भरल्यास महावितरण कडक कारवाई करणार असल्याने जवळपास २० गावांचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.
तालुक्यातील मादळमोही येथे ३३ उपकेंद्र आहे. या केंद्रांतर्गत अनेक गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. सध्या मादळमोही ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत आॅगस्ट २०१४ पर्यंत २० गावांतील शेतकऱ्यांनी कृषीपंपाचे वीजदेयके भरलेले नाही. यामध्ये खडकी, धारवंटा, मानकापूर चिखली, कवडगाव, वडगाव, खुशी, कोळेवाडी, गाडेवाडी, टकलेवाडी, वंजारवाडी, बुधनरवाडी, आदी गावांत शून्य टक्के वसुली आहे. त्यामुळे २० गावांचा वीज पुरवठा तात्काळ बंद करण्याचे आदेश महावितरण कंपनीने दिले आहेत. तरी तात्काळ थकित वीजबील न भरल्यास महावितरणकडून कारवाई करण्यात येणार आहे.
ज्या गावांची वसुली २० टक्यांपेक्षा कमी आहे, अशा गावांची वीज बिलाची वसुली वाढविण्याकरीता महावितरण कंपनीकडून वीज बील भरण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. मात्र या जनजागृती अंतर्गतही वीज बील भरणा न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
यामुळे वीज बील वसूली करीता महामंडळाचे कर्मचारी गावोगावी वाऱ्या करू लागले आहेत. त्यामुळे ज्या लोकांकडे वीज बील बाकी आहे त्यांचे धाबे दणाणले आहेत. मागील अनेक दिवसापासून महावितरण कंपनीकडून मोफत वीज वापरणाऱ्यांवर कडक कारवाई होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत मादळमोहीचे कनिष्ठ अभियंता प्रमोद दारतोंडे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांकडे कृषी पंपाची थकबाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेऊन वील बील भरावे व होणारी कारवाई टाळावी. यासाठी पथके तयार करण्यात आले असून हे पथके गावोगावी जाणार आहेत. ग्राहकांनी वीज बील भरून महामंडळाला सहकार्य करण्याचे अवाहनही त्यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The distribution of 20 villages will be dissolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.