१८५ कोटींचे जिल्ह्यात वाटप

By Admin | Updated: April 22, 2016 00:24 IST2016-04-22T00:23:16+5:302016-04-22T00:24:27+5:30

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी यावर्षी जिल्ह्याला प्राप्त झालेले १८५ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे़

Distribution of 185 crores in district | १८५ कोटींचे जिल्ह्यात वाटप

१८५ कोटींचे जिल्ह्यात वाटप

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी यावर्षी जिल्ह्याला प्राप्त झालेले १८५ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे़ त्यामुळे आता महसूल प्रशासनाकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कुठलेही अनुदान शिल्लक राहिले नाही़
पावसाच्या अनियमितपणाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे़ या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जानेवारी महिन्यात जिल्ह्याला १११ कोटी ६९ लाख रुपये आणि फेब्रुवारी महिन्यात ४३ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़ मागील वर्षीच्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले आहे़ हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले़
परभणी जिल्ह्याला सुमारे ४०० कोटी रुपयांच्या अनुदानाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात १८५ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते़ जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला तहसीलदारांच्या खात्यावर हे अनुदान जमा केले आणि त्यानंतर तहसील प्रशासनाने लाभार्थी शेतकऱ्यांची नावे, खातेक्रमांक आणि प्राप्त अनुदान याची यादी तयार करून त्या त्या बँकांकडे वर्ग केली आहे़ त्यामुळे हे संपूर्ण अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे़ जिल्हा प्रशासनाकडे आता शेतकऱ्यांसाठी अनुदानाची रक्कम शिल्लक राहिलेली नाही़
जिल्हा प्रशासनाने जरी त्यांची जबाबदारी पूर्ण केली असली तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणे बाकी आहे़ शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम बँकांकडे शेतकऱ्यांच्या यादीसह पोहचली आहे़ मात्र बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ही रक्कम जमा करण्याचे काम बँकांकडून सुरू आहे़ लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Distribution of 185 crores in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.