जि. प. अध्यक्ष पदाच्या निवडीची सुनावणी शनिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST2021-02-05T04:19:01+5:302021-02-05T04:19:01+5:30

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडप्रक्रियेला दिलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणी गुरूवारी घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड ३ जानेवारी २०२० ...

Dist. W. Presidential election hearing on Saturday | जि. प. अध्यक्ष पदाच्या निवडीची सुनावणी शनिवारी

जि. प. अध्यक्ष पदाच्या निवडीची सुनावणी शनिवारी

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडप्रक्रियेला दिलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणी गुरूवारी घेण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड ३ जानेवारी २०२० रोजी झाली होती. निवडणुकीसाठी मतदानही झाले. परंतु, मतदानाच्या वेळी गोंधळ झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भानुदास पालवे यांनी सभा तहकूब केली. ही सभा दुसऱ्या दिवशी झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवार देवयानी डोणगावकर आणि मीना शेळके यांना समसमान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीचा कौल घेण्यात आला. त्यात मीना शेळके यांनी बाजी मारली. त्यांची निवड घोषित करण्यात आली.

डोणगावकर यांनी अ‍ॅड. सिध्देश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपिठात याचिका दाखल करुन आव्हान दिले. त्यात अध्यक्षपदाची निवड खंडपीठाच्या निकालाच्या अधीन राहील, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

त्यानंतर याचिकेवर अनेकवेळा सुनावण्या झाल्या. याचिकेवर पुढील सुनावणी आता ३० जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.

Web Title: Dist. W. Presidential election hearing on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.