धारुर कडकडीत बंद
By Admin | Updated: June 11, 2014 00:26 IST2014-06-11T00:20:54+5:302014-06-11T00:26:04+5:30
धारुर: फेसबुकवर महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना करुन समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या.

धारुर कडकडीत बंद
धारुर: फेसबुकवर महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना करुन समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या. महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणाचा निषेध करीत मंगळवारी धारुरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्ष सामाजिक संघटनांनी मिळून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची फेसबुकद्वारे दोन दिवसांपूर्वी विटंबना करण्यात आली होती. याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. फेसबुकवर महापुरुषाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी धारुर शहर बंद ठेवण्यात आले. व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच या बंदला प्रतिसाद दिला. यावेळी सर्व पक्ष, संघटना यांनी शहरातून रॅली काढून आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार के.आर. गेंदले यांना दिले. महामंडळाच्या बससेवाही उशिरापर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. धोंडीराम सिरसट, किशोर गायसमुद्रे, राजमोहन गायसमुद्रे, अजित सिरसट, महादेव गायसमुद्रे, सुनील कांबळे, बंटी गायसमुद्रे हे सहभागी होते. (वार्ताहर)