वीज कनेक्शन तोडणाऱ्या अधिकाऱ्यास शिविगाळ
By Admin | Updated: August 17, 2014 00:08 IST2014-08-17T00:08:24+5:302014-08-17T00:08:24+5:30
बीड: परळी येथील एका पिठाच्या गिरणिचे वीज कनेक्शन तोडणाच्या कारणावरुन महावितरणच्या कर्मचाऱ्यास दोघांनी शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

वीज कनेक्शन तोडणाऱ्या अधिकाऱ्यास शिविगाळ
बीड: परळी येथील एका पिठाच्या गिरणिचे वीज कनेक्शन तोडणाच्या कारणावरुन महावितरणच्या कर्मचाऱ्यास दोघांनी शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील विश्वंभर आव्हाडे यांच्या गिरणीचे कनेक्शन महावितरण कर्मचारी संभाजी गायकवाड यांनी तोडले होते. त्यामुळे त्यांना अमोल रमेश साळवे व बबलु रतन आदोडे यांनी ‘तु कनेक्शन का तोडलेस’ असे म्हणून शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन साळवे व आदोडे यांच्या विरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि पल्लेवाड करीत आहेत.(प्रतिनिधी)