धनादेश अनादर; एकास कारावास
By Admin | Updated: January 8, 2017 23:47 IST2017-01-08T23:44:07+5:302017-01-08T23:47:09+5:30
उमरगा : पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज परतफेडीसाठी दिलेल्या धनादेशाच्या अनादर प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने एकास दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़

धनादेश अनादर; एकास कारावास
उमरगा : पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज परतफेडीसाठी दिलेल्या धनादेशाच्या अनादर प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने एकास दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़
याबाबत अॅड़ जीक़ेग़ायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील शाहूराज माधव पवार यांनी २१ आॅगस्ट २०१३ रोजी मातोळा येथील हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसस्थेकडून ५० हजार रूपयांचे कर्ज घेतले होते़ या कर्जाच्या परतफेडीसाठी शाहुराज पवार यांनी उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी बँकेचा चेक दिला होता़ सदरील धनादेश नारंगवाडी येथील उस्मानाबाद जिल्हा बँकेत वटविण्यासाठी टाकल्यानंतर पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने तो न वटता परत आला़ त्यानंतर बालाजी भोसले यांनी पवार यांना १५ दिवसात रक्कम अणून देण्याची विनंती केली होती़ मात्र, रक्कम न मिळाल्याने उमरगा येथील प्रथम वर्ग न्यायालयात कलम १३८ प्रमाणे खटला दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणाची न्यायाधीश ए़एऩ नावंदर यांच्यासमोर सुनावणी झाली़ या प्रकरणात समोर आलेले पुरावे, बालाजी भोसले यांची साक्ष व अॅड़ जीक़े़ गायकवाड यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी शाहूराज पवार याला दोन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली़ फिर्यादीच्या बाजूने अॅड़ जीक़ेग़ायकवाड यांनी काम पाहिले़