शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

करोडीच्या सरपंचासह सदस्यांच्या अपात्रतेचा निर्णय खंडपीठाकडून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 17:14 IST

Aurangabad High Court : सरपंचांनी पदाचा दुरुपयोग करून बांधकाम परवानगी दिल्याचा होता आरोप

ठळक मुद्देग्रामपंचायतीने हा ठराव काही वाईट उद्देशाने केलेला नाही.त्यात ग्रामपंचायतीचे काही नुकसानही झालेले नाही.

औरंगाबाद : औरंगाबाद तालुक्यातील करोडी साजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच अंकुश राऊत आणि उर्वरित सर्वच सदस्यांना अपात्र ठरवणारा अप्पर विभागीय आयुक्तांचा आणि ग्रामविकास राज्यमंत्र्यांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी बुधवारी रद्द केला.

करोडी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सरपंच व सदस्यांनी ६ रहिवाशांना बांधकाम करण्यास मंजुरी दिली होती. त्याविरुध्द ग्रामपंचायत सदस्य शेख इस्माईल याने अप्पर विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती की, सिडकोची परवानगी न घेता मंजुरी दिलेली असल्यामुळे हा पदाचा दुरुपयोग आहे, त्यामुळे सरपंचपद रद्द करण्यात यावे. कायद्यातील तरतुदीनुसार अशी परवानगी घेणे आवश्यक होते. अप्पर विभागीय आयुक्तांनी सरपंचासह सर्व सदस्यांना अपात्र ठरवले. सरपंच अंकुश राऊत व ८ सदस्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे या निर्णयाविरुध्द अपील केले असता, ग्रामविकास मंत्र्यांनी हे अपील फेटाळले. तेव्हा त्यांनी खंडपीठात याचिका दाखल करून दोन्ही आदेशांना आव्हान दिले. खंडपीठात सरपंच व ८ सदस्यांची बाजू अ‍ॅड्. रवींद्र गोरे यांनी मांडली.

खंडपीठाचा निष्कर्षखंडपीठाने निकाल देताना निष्कर्ष नोंदवला की, ग्रामपंचायतीने बांधकाम परवानगी रद्द केली आहे. या बाबीचा अप्पर आयुक्तांनी किंवा राज्यमंत्र्यांनी विचार केलेला नाही. ६ पैकी केवळ एकानेच बांधकाम केले व तेही काढून घेण्याची त्याने हमी दिलेली होती. ग्रामपंचायतीने हा ठराव काही वाईट उद्देशाने केलेला नाही. त्यात ग्रामपंचायतीचे काही नुकसानही झालेले नाही. शिवाय या प्रकरणाची चौकशी गटविकास अधिकाऱ्यांनी केली, तेव्हा त्यांच्यासमोर ग्रामपंचायत सदस्यांचे जबाबही नोंदवण्यात आलेले नाहीत. त्यांना सुनावणीची पुरेशी संधी न देता अपात्र ठरवले. ग्रामपंचायतीचा ठराव गैरवर्तन ठरत नसल्यामुळे सरपंच व सदस्यांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द ठरवण्यात येतो.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठsarpanchसरपंचAurangabadऔरंगाबाद