तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीवरून ग्रामसभेत तंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:33 IST2017-10-03T00:33:19+5:302017-10-03T00:33:19+5:30
चिंचोली लिंबाजी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद झाल्याने ग्रामसभा तहकूब करावी लागली.

तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीवरून ग्रामसभेत तंटा
लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचोली लिंबाजी : चिंचोली लिंबाजी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद झाल्याने ग्रामसभा तहकूब करावी लागली. यावेळी मोठा जमाव जमा झाल्याने गोंधळ उडून काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळल्याने मोठा अनर्थ टळला. तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीतच तंटा झाल्याने गावातील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
चिंचोली लिंबाजी हे पंधरा हजार लोखसंख्येचे व तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव आहे. ही ग्रापंचायत पंधरा सदस्यीय असून सोमवारी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुशीलाबाई हिरे होत्या. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन तंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठी सत्ताधारी गटाकडून रामदास पहिलवान यांचे नाव सुचविण्यात आले. मात्र विरोधी गटाने या नावास विरोध करून लक्ष्मण भगवान पवार यांचे नाव पुढे करण्यात आले व हात वर करून मतदान घेण्याची मागणी करण्यात आली. परंतु सत्ताधारी गटाने ही मागणी अमान्य करून गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात यावे, अशी मागणी लाऊन धरली.
यातूनच दोन्ही गटाच्या सदस्यांमध्ये वादास सुरुवात झाल्याने मोठा जमाव याठिकाणी जमा झाला.