वादग्रस्त विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:04 IST2021-06-24T04:04:01+5:302021-06-24T04:04:01+5:30

औरंगाबाद : नियुक्तीपासूनच विविध वादात अडकलेले विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. डी.डी. गायकवाड यांना अखेर राज्य शासनाने कार्यमुक्त केले. ...

Disputed Divisional Higher Education Joint Director fired | वादग्रस्त विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यमुक्त

वादग्रस्त विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यमुक्त

औरंगाबाद : नियुक्तीपासूनच विविध वादात अडकलेले विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. डी.डी. गायकवाड यांना अखेर राज्य शासनाने कार्यमुक्त केले. त्यांच्या जागी शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्थेतील प्राध्यापक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी डॉ. गायकवाड यांच्याकडून मंगळवारी (दि.२२) सायंकाळी पदभार स्वीकारला.

शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक असलेले डॉ. गायकवाड यांची तत्कालीन सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांच्या जागेवर प्रभारी सहसंचालक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या नियुक्तीपासून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. बदनापूर येथील महाविद्यालयातील शिक्षा झालेल्या प्राध्यापकाचे थकित वेतन देण्यापासून ते चर्चेत आले होते. त्यानंतर बामुक्टो, बामुक्टो, स्वाभिमानी मुप्टा, रिपाइं आठवले गट यांच्यावतीने डॉ. गायकवाड यांच्या विरोधात अनेक तक्रारी संचालक, उच्चशिक्षणमंत्री यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. प्राध्यापकांच्या पदोन्नती प्रकरणात गैरप्रकार होत असल्याच्याही अनेक तक्रारी करण्यात येत होत्या. सहसंचालक कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर हे कार्यलय पुन्हा एकादा चर्चेत आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी डॉ. गायकवाड यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले. त्यांचा पदभार डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी तात्काळ पदभार स्वीकारला आहे.

फोटो कॅप्शन : उच्चशिक्षण विभागाचे मावळते सहसंचालक डॉ. डी.डी. गायकवाड हे नवनियुक्त डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांचा सत्कार करताना.

Web Title: Disputed Divisional Higher Education Joint Director fired