शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
2
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
3
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
4
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
5
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
6
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
7
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
8
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
9
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
10
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
11
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
12
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
13
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
14
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
15
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
16
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
17
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
18
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
19
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
20
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
Daily Top 2Weekly Top 5

मुलींचे फोटो काढण्यावरून वाद, समतानगरमध्ये ५० ते ६० जणांत तुंबळ हाणामाऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:50 IST

मध्यरात्री मोठा तणाव : पोलिसांची वेळीच धाव; मुलींवर बलात्कार करून कापून फेकण्याची धमकी देत अश्लाघ्य शिवीगाळ

छत्रपती संभाजीनगर : शेकोटीजवळ बसलेल्या लहान मुलींचे काही टवाळखोरांनी मोबाइलमध्ये छायाचित्र काढल्यावरून समतानगरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. ५० ते ६० जणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी होत एकमेकांवर लाठ्या काठ्या, प्लास्टिक पाइपने वार करण्यात आले. रविवारी रात्री १२ वाजता क्रांती चौकातील समतानगर ते संसारनगरमध्ये घडलेल्या घटनेने काही काळ तणाव होता. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनुचित प्रकार टळला.

तक्रारदार चालक असून संसारनगरमध्ये राहतात. ६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या तीन लहान मुली थंडीमुळे घरासमोर शेकोटीजवळ बसल्या. समतानगरच्या काही टवाळखोरांनी मुलींचे मोबाइलमध्ये छायाचित्र काढले. हे त्यांच्या मुलाने पाहिले. रात्री ११:३० वाजेच्या सुमारास पुन्हा तेच युवक त्या परिसरातून जात होते. त्यावेळी तक्रारदाराच्या मुलाने बहिणीचे छायाचित्र का काढले, असे विचारले. पाच ते सहा जणांनी त्याला शिवीगाळ व मारहाण केली.

पाहता पाहता क्षणात ३५ ते ४० जणांचा जमाव आलाहल्लेखोरांनी त्यांच्या अन्य साथीदारांना बोलावले. मुलाच्या कुटुंबासह रहिवाशांनी धाव घेतली. समतानगरमधून अचानक ३५ ते ४० जणांचा जमाव संसारनगरमध्ये घुसला. त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मुलींवर बलात्कार करून कापून फेकण्याची धमकी देत अश्लाघ्य शिवीगाळ केली. लाठ्याकाठ्या, प्लास्टिक पाइपने हाणामारी जुंपली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

पाच जणांची ओळख पटली, तपास सहायक आयुक्तांकडेहल्लेखोरांमध्ये अल्फाज कुरेशी, निजाम कुरेशी, अमन कुरेशी, मुजमील कुरेशी, शेहबाज कुरेशी यांच्यासह ३५ ते ४० जणांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अन्य हल्लेखोरांची ओळख पटविणे सुरू होते. मात्र, एकाही आरोपीला अटक झालेली नव्हती. सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख तपास करत आहेत.

सुरेवाडीतही सशस्त्र गट समोरासमोरदुसऱ्या घटनेत हर्सूलच्या सुरेवाडीत शनिवारी रात्री शस्त्रधारी गट समोरासमोर येऊन तुंबळ हाणामारी झाली. तुंबळ हाणामारी सुरू असतानाच पोलिस पोहोचताच अनेकांनी पोबारा केला. मात्र, यात तीन जण गंभीर जखमी झाले. यात हर्सूल पोलिसांनी फिर्यादी होत सुरेश राधाकिसन सुरे, किरण खेमचंद पचलोरे, रूपेश भागीरथ सुरे, शिवा अंबादास सुरे, मनिष गंगाधर ब्राह्मणे, कृष्णा एकनाथ ब्रह्मे, दीपक ब्रह्मे, सागर पांढरे, मनोज हरणे, रमेश खेमचंद गुंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Clash Over Girls' Photos: Major Brawl in Samta Nagar

Web Summary : A dispute over photographing young girls escalated into a major brawl in Samta Nagar, Chhatrapati Sambhajinagar. Dozens clashed with sticks and pipes, prompting police intervention to restore order. Five individuals identified; investigation ongoing.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर