शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खासदार जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून महापालिकेच्या सभेत गोंधळ; एमआयएमचे ५ नगरसेवक निलंबित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 12:45 IST

सिद्धार्थ उद्यानातील चार बछद्यांच्या नामकरण सोहळा प्रकरणावरून एमआयएम नगसेवक आक्रमक होती

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावाकडे महापौरांनी दुर्लक्ष केल्याने एमआयएमच्या नगरसेवकांनी आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ घातला. यावेळी राजदंड पळविण्याच्या प्रयत्न झाला, गदारोळ वाढत गेल्याने महापौरांनी एमआयएमची सहा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापालिकेत पहिलीच सभा होत आहे.महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी, उपायुक्तांना शासनाकडे परत पाठविणे, सव्वाशे कोटी रस्त्यांच्या यादीचा वाद, शहराचा पाणी प्रश्न आणि बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात एमआयएम खासदारांना डावलल्यावरून आज होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा वादग्रस्त होण्याची चिन्हे होती. 

सिद्धार्थ उद्यानातील चार बछद्यांच्या नामकरण सोहळा मागच्या आठवड्यात पार पडला. याच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार इम्प्तीयाज जलील यांचे नाव नव्हते. यावरून एमआयएम नगरसेवक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक होती. सभा सुरु होताच भाजप नगरसेवकांनी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तर एमआयएम नगसेवकांनी खा. जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. महापौरांनी अभिनंदन प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. यामुळे एमआयएम नगरसेवक आक्रमक झाली, त्यांनी महापौरांच्या समोरील जागेत धाव घेतली. यातच यातच भाजप नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर घोषणाबाजी सुरु केली. यामुळे दोन्ही पक्षाची नगरसवेक समोरासमोर आली. 

गोंधळ वाढत जात असतानाच एमआयएम नगरसेवकांनी राजदंड पळविण्याच्या प्रयत्न केला. यावरून महापौरांनी एमआयएमच्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले. यानंतर सभा तहकूब करण्यात आली आहे.मात्र एमआयएम नगरसेवक अभिनंदन प्रस्तावावरून सभागृहात बसून आहेत. विशेष म्हणजे या गोंधळात शिवसेना नगरसेवक कुठेच नव्हते. शिवसेनेचे महापौर यावेळी एकाकी पडल्याचे चित्र होते. 

सर्वसाधारण सभेत हे मुद्दे पण आहेत चर्चेत अधिकाऱ्यांच्या मुद्यांवरून सभेत वादग्रस्त चर्चा होण्याची शक्यता आहे. सेवानिवृत्त उपायुक्त अय्युबखान आणि लेखाधिकारी एन.जी. दुर्राणी यांच्या विभागीय चौकशीच्या प्रस्तावावरून वादळी चर्चा होणे शक्य आहे, तर वर्षभरापूर्वी शासनाकडून प्रतिनियुक्तीने उपायुक्तपदी आलेल्या मंजूषा मुथा यांच्याविषयी पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली असून, त्यांना पुन्हा शासनाकडे पाठविण्याची मागणी सभेत नगरसेवकांकडून होण्याची शक्यता आहे. उपायुक्त मुथा या कोणत्याही संचिकेवर निर्णय घेत नाहीत, अशा नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभेत त्यांना परत पाठविण्याचा प्रस्ताव नगरसेवकांकडून मांडला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.  दोन महिन्यांपासून शहरात पाणी प्रश्न पेटलेला आहे. शहराला तीन दिवसांआड समान पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मनपाने दिले. ते आश्वासन हवेत विरले आहे. पालिका नियमित पाणीपुरवठा करण्यात असक्षम ठरते आहे. त्यामुळे सभेत नगरसेवक पाणी प्रश्नावरून आक्रमक झाली. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा