ग्रामपंचायत निवडणुकीवरून वडोद येथे दोन गटांत वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:06 IST2021-01-21T04:06:16+5:302021-01-21T04:06:16+5:30

वढोद (बु.) येथील पद्माबाई प्रभाकर देवकर यांनी फिर्याद दिली की, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घरी ...

Dispute between two groups in Vadodara over Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीवरून वडोद येथे दोन गटांत वाद

ग्रामपंचायत निवडणुकीवरून वडोद येथे दोन गटांत वाद

वढोद (बु.) येथील पद्माबाई प्रभाकर देवकर यांनी फिर्याद दिली की, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घरी जेवत असताना गावातील आशीष संघवे, ज्ञानेश्वर चव्हाण, राहुल चव्हाण, मयूर चव्हाण, शुभम चव्हाण व राजू संघवे यांनी त्यांच्यासह पतीस धक्काबुक्की करीत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, तर आशीष संघवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रभाकर देवकर व त्यांची पत्नी पद्मा देवकर यांनी घरासमोर येऊन राजकारणात आमच्या विरोधात उभे राहण्याची तुमची हिंमत कशी झाली यावरून वाद करीत घरात घुसून मारहाण केली. यावरून वरील दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार संजय जगताप, नवनाथ कोल्हे, विनोद बिघौत, योगेश नाडे करीत आहेत.

Web Title: Dispute between two groups in Vadodara over Gram Panchayat elections