शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

धान्य पुरवठ्यात विस्कळीतपणा

By admin | Updated: September 3, 2015 00:19 IST

उमरगा : उमरगा व तालुक्यातील मुरूम येथील गोडाऊनमधून रास्तभाव दुकानदारांना वेळेवर धान्याचा पुरवठा होत नाही़ परिणामी उमरगा विभागातील ९७ गावातील

उमरगा : उमरगा व तालुक्यातील मुरूम येथील गोडाऊनमधून रास्तभाव दुकानदारांना वेळेवर धान्याचा पुरवठा होत नाही़ परिणामी उमरगा विभागातील ९७ गावातील १५१ दुकानांतर्गतच्या ६७ हजार ५१६ कार्डधारकांना याचा फटका सहन करावा लागत आहे़पुरवठा विभागाकडून प्राधान्य कुटुंब केसरी, शुभ्र, प्राधान्य कुटुंब बी.पी.एल. प्राधान्य कुटुंब अंत्योदय आदी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना शासनाकडून गहू, तांदूळ, साखर आदी धान्य स्वस्त भावाने दिले जाते. उमरगा विभागातील ९७ गावांसाठी १५१ रास्तभाव दुकाने आहेत़ तर तालुक्यात २७५२ शुभ्र, १० हजार ६८१ केशरी, १७ हजार ४५३ प्राधान्य कुटुंब केसरी शिधापत्रिकाधारक, १४ हजार २१५ प्राधान्य कुटुंब बी.पी.एल. शिधापत्रिका धारक आहेत़ उमरगा येथील गोडाऊनमधून १०२ दुकानांना धान्याचा पुरवठा होतो़ या दुकानांतर्गत ७१ गावातील कार्डधारकांना धान्याचा पुरवठा होतो़ तर मुरूम गोडाऊनमधून ४९ दुकानदारांना धान्याचा पुरवठा होत असून, याचा लाभ २६ गावातील कार्डधारकांना होत आहे़ यात तालुक्यातील तलमोड, दगडधानोरा, मानेगोपाळ, जगदाळवाडी, नारंगवाडी, मातोळा, कवठा, दाळींब, केसरजवळगा, वागदरी, व्हंताळ, बलसूर, जकेकूर, येळी, जकेकूरवाडी, औराद, कदेर, मुरळी, कंटेकूर आदी गावे मुरूम व उमरगा शहरापासून खूपच दूर आहेत़ त्यामुळे मालाच्या वाहतुकीत मोठा विलंब होताना दिसत आहे़ तर अनेक वेळा गोडाऊनमध्येच मागणीनुसार धान्य उपलब्ध नसल्याने गावात धान्याचा पुरवठा उशिराने होत आहे़ गोडाऊनमधून दुकानदारांना उशिराने धान्याचा पुरवठा होत असल्याने याचा थेट फटका तालुक्यातील कार्डधारकांना सहन करावा लागत आहे़ (वार्ताहर) कदेर, व्हंताळ, भगतवाडी, चिरेवाडी, सावळसूर, धाकटीवाडी, एकोंडीवाडी, अंबरनगर, तुगाव, कंटेकूर या गावातील लाभार्थींना महिला बचतगटामार्फत रास्त भावाने धान्याचा पुरवठा करण्यात येतो.प्राधान्य कुटूंब अंत्योदय मधील ६ हजार ८७१ शिधापत्रिकाधारकांना १ हजार ३७४ क्विंटल गहू तर ६८७ क्विंटल तांदळाचे प्रतिमाह वाटप होते़ तर तालुक्यातील ६७ हजार ५१६ कार्डधारक असून, या अंतर्गत ३ लाख २६ हजार २६५ लाभार्थ्यांना प्रतिमहा ६० हजार २६ क्विंटल गव्हाचे तर ३ हजार ७८८ क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात येते़याशिवाय इतर शिधापत्रिकांनाही नियमानुसार धान्याचे वाटप करण्यात येते़शासनाकडून दुकानदारांना प्रतिक्विंटल ७० रुपये कमिशन दिले़ तसेच प्रतिक्विंटल साडेनऊ रुपये रिपीट मार्जीन दिले जाते. तर प्रवास खर्च व कमिशन तुटपुंजे असून, तोटा सहन करावा लागत असल्याचे रास्तभाव दुकानदारांचे म्हणणे आहे़ शासनाने कमिशनमध्ये वाढ करावी, अशी मागणी के. व्ही. क्षीरसागर, सुधाकर गायकवाड, व्हंताळ येथील बचतगटाच्या सुनीता ममाळे यांनी केली़