स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ बरखास्त करा

By Admin | Updated: November 6, 2016 00:36 IST2016-11-06T00:36:05+5:302016-11-06T00:36:05+5:30

ग्रामीण तथा शहरी भागातील शालेय खेळाडूंना क्रीडा प्रकारात नैपुण्यपूर्ण कामगिरी करता यावी यासाठी स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाची स्थापना करण्यात आली.

Dismiss indigenous sports clubs | स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ बरखास्त करा

स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ बरखास्त करा


गंगापूर : आरक्षणाच्या दणक्याने गंगापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत रंग भरला आहे. सक्रिय नेत्यांनी राजकारणाच्या फडातून माघार घेण्याऐवजी आपल्या गृहिणींना राजकारणाच्या फडात आणून त्यांच्या पदराआडून सत्तेची धुरा सांभाळण्याची तयारी सुरु केली आहे. यात कुणाला यश येते हे मात्र मतदार ठरविणार असल्याने मतदारांना आकर्षित करण्याची व्यूहरचना सर्वच पक्षाच्या पुढाऱ्यांनी आखली
आहे.
गंगापूरच्या नगराध्यक्षपदाची दोरी आता महिलेच्या हातात जाणार असल्याने या पदासाठी उत्सुक असलेल्या व गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पुरुष मंडळीच्या पदरी निराशा आली. तर काही पक्षात हंगामी राजकारण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आरक्षणामुळे पंचाईत झाली.
काँग्रेसची सत्ता असताना २००१ मध्ये गंगापूर न.प.त थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी शिवसेनेच्या शोभा राजपूत नगराध्यक्ष झाल्या होत्या. त्यांनी त्यावेळी आपल्या प्रतिस्पर्धी रेखा दारुंटे यांचा पराभव केला होता.
मात्र दरम्यानच्या काळात दारुंटे यांनी राजपूत यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतल्याने त्यांना अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत रेखा दारुंटे नगराध्यक्षा झाल्या. आता मात्र या पदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निघाल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे. गंगापूर नगर परिषदेचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास पाहता येथील पदाधिकारी आपल्या सोयीनुसार पक्षाचा हंगामी स्वरुपात वापर करत असल्याचे चित्र आहे.
येथे काही नगरसेवक निवडून येण्यापुरता पक्षाचा आधार घेतात. निवडून आल्यावर मात्र त्यांना पक्षाचा विसर पडतो. शहरात सद्यस्थितीला काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे आणि ती टिकवून ठेवण्याचे काम येथील नेतृत्वाने आजपर्यंत चांगल्या प्रकारे केले आहे. मात्र काँग्रेसमध्ये देखील येथे दोन गट आहेत. यात विद्यमान आ. प्रशांत बंब यांना मानणारा एक गट अलीकडच्या काळात निर्माण झाला. तो गट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतो.
नगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्या खालोखाल शिवसेनेचा क्रमांक लागतो. सेना नगरसेवकांचे हात बळकट करण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम, खा. राजकुमार धूत यांनी वेळोवेळी आपला विकास निधी गंगापूर पालिकेला देऊन त्यांना हातभार लावला. तरीदेखील शिवसेनेकडून विकास कामाच्या जोरावर कडवा राजकीय विरोध गेल्या पाच वर्षात पहावयास मिळाला
नाही.
गंगापूर शहर बचाव कृती समितीचे नगरसेवक प्रदीप पाटील यांनी येणाऱ्या निवडणुकीत तरुण उमेदवारांची फळी उभी करुन स्वतंत्र गट निर्माण केला आहे. त्यामुळे स्थानिक पुढाऱ्यांसमोर हे निश्चितच आव्हान उभ ठाकले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढाऱ्यांचाच जास्त भरणा झाल्यामुळे कार्यकर्ता होण्यास कुणीच तयार नाही. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादीची परिस्थिती अधिकच खालावल्याचे दिसते. येणाऱ्या काळात राष्ट्रवादीला काही पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस पक्षासोबत सूत जुळवल्याशिवाय पर्याय नाही.
एम.आय.एम.चे डॉ. गफ्फार कादरी यांनी शहरातील विकास कामाचा आढावा घेत न.प. निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. यासाठी चाचपणीही सुरू आहे. सध्या तरी एमआयएमकडून तस्लीम मास्टर यांची पत्नी शाहीन शेख यांचे
नाव आघाडीवर आहे. या ठिकाणी ६५०० मुस्लिम मतदार
आहेत.
दलित मतदारही पक्षासोबत असल्याने त्यांनी गंगापुरात निवडणूक लढविण्यासाठी सुनियोजन केले तर इतर पक्षांना ते महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगर पालिकेची सूत्रे आपल्याच हाती यावे यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सध्यातरी सुवर्णा संजय जाधव, डॉ.शीतल संदेश गंगवाल, वंदना प्रदीप पाटील, शोभा लक्ष्मण राजपूत, तृप्ती सुशीलकुमार मंत्री, फरहाना फैसल चाऊस, शाहीन तस्लीम मास्टर, सुनीता किशोर धनायत हे आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

Web Title: Dismiss indigenous sports clubs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.