उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
By Admin | Updated: June 23, 2014 00:21 IST2014-06-22T22:58:05+5:302014-06-23T00:21:29+5:30
केज: केज-कळंब रस्त्यावर काही जणांनी केलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी मागील पाच दिवसांपासून केज येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
केज: केज-कळंब रस्त्यावर शिवाजीनगर भागातील बाळासाहेब गलांडे यांच्या मालकीच्या तीन हेक्टर भूखंडावर काही जणांनी केलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी मागील पाच दिवसांपासून केज येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाची पोलीस आणि तहसील प्रशासनाने दखल घेतलेली नाही. शनिवारी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती.
केज शहरातील शिवाजी नगर भागात बाळासाहेब गलांडे यांच्या मालकीची जागा आहे. सातबाराला नोंद देखील आहे. असे असताना देखील केज येथील रामचंद्र गोपीनाथ जाधव, कैलास गाढवे, दत्तु खोडसे, राजा खोडसे, अंगद खोडसे, निर्मला खोडसे, चंद्रकांत जमाले, प्रताप जाधव, रविराज जाधव यांनी गलांडे यांच्या मालकीच्या भूखंडावर अतिक्रमण केले असल्याचे उपोषणकर्त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणांबाबत केज तहसीलने अतिक्रमण करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत.
मात्र याकडे संबंधित पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तहसील कार्यालयाला दिलेल्या निवेदनात केला आहे. (वार्ताहर)