शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
5
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
6
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
7
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
8
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
9
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
11
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
12
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
13
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
14
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
15
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
16
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
17
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
18
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
19
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
20
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात भातावर करपा रोगाचे थैमान

By admin | Updated: October 23, 2014 22:50 IST

शेतकऱ्यांमध्ये भीती : घनसाळसह पिके अडचणीत


शेतकऱ्यांमध्ये भीती : घनसाळसह पिके अडचणीतआजरा : गेले पंधरा दिवस सुरू असलेला हवामानातील बदलामुळे आजरा तालुक्यातील घनसाळसह, संकरित भात पिकांवर मानेवरील करपा (मानमोड्या) रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असल्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी वर्गाकडून या नुकसानीचे शास्त्रीय यंत्रणेमार्फत पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी होत आहे.
सध्या तालुक्यातील बहुतांश भागातील भात पिके पोसावली आहेत. मात्र, अशा पोसावलेल्या भात पिकांच्या लोंबावर मानेवरील करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. आजरा, देवर्डे, पोळगाव, श्रृंगारवाडी, चाफवडे, गवसे भागात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.
जिल्हा परिषद व कृषी विभागाच्या प्रयत्नातून घनसाळ भातक्षेत्र वाढीच्या उद्देशाने चालू साली १५० एकर क्षेत्रांवर घनसाळ लागवडीचा पथदर्शी प्रयोग राबविला आहे. यातील बहुतांश भात पीक या रोगामुळे अडचणीत आले आहे. जादा दिवसांचा कालावधी घेणाऱ्या भाताच्या संकरित जातीही या रोगाला बळी पडत आहेत.
केवळ चारच दिवसांत उभे असणारे पीक वाया जात आहे. यामुळे वर्षभराकरिता लागणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या धान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिके पोसावली असतानाच रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने औषध फवारणीचा कालावधीही निघून गेला आहे. जिथे भात पिके अद्याप पोसावलेली नाहीत, तेथे काही अंशी प्रतिबंधात्मक उपाय शक्य आहे. मात्र, त्याचवेळी नुकसानग्रस्त पिकांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न पुढे येत आहे. (प्रतिनिधी)

शास्त्रज्ञांमार्फत
पाहणी व्हावी
सध्या भात उत्पादक शेतकरी मानेवरील करपा रोगामुळे अडचणीत आला असून, कृषिक्षेत्रातील शास्त्रज्ञांमार्फत पिकांची पाहणी होऊन नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी दिली.