साथ रोगाने डोके वर काढले
By Admin | Updated: July 31, 2016 01:13 IST2016-07-31T01:01:59+5:302016-07-31T01:13:25+5:30
ंलातूर : पावसाळा सुरू झाल्यापासून लातूर जिल्ह्यात जलजन्य आजाराचे प्रमाण वाढले असून सर्वोपचार रूग्णालयात गर्दी वाढली आहे़

साथ रोगाने डोके वर काढले
ंलातूर : पावसाळा सुरू झाल्यापासून लातूर जिल्ह्यात जलजन्य आजाराचे प्रमाण वाढले असून सर्वोपचार रूग्णालयात गर्दी वाढली आहे़ हिवताप विभागाने १२ डेंग्यू संशयित रूग्णांच्या रक्ताचे नमुने नांदेडच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे़ अॅबेटिंग, धूर फवारणी तर नाहीच; पण साधी जनजागृतीही लातूर शहरात करण्यात आलेली नाही़ साथरोग नियंत्रणासाठी मनपाकडे अपुरी यंत्रणा असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे़
गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार आहे़ पावसाळ्यात होणाऱ्या आजारांबाबत मात्र प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे़ डेंग्यू, मलेरिया हिवताप यासारख्या गंभीर आराजांच्या रूग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ ताप, सर्दी, खोकला अशा संसर्गजन्य आजारांच्या रूग्णांची वाढ होऊ लागली आहे़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात जुलै महिन्यात गॅस्ट्रोचे ४८, डेंग्यू १३, मलेरिया २, तापीचे १०, टायफॉईड २ असे एकूण ७५ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत़ तर अशा रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले़
ग्रामीण भागातही अशीच अवस्था आहे़ अतिसार पंधरवड्यात आरोग्य विभागाने जनजागृती केली, पण औषधांचा पुरवठा अपुरा केल्याने रूग्णांची ओरड आहे़ शासनाकडून औषधांचा पुरवठा झाला नसल्याने गैरसोय वाढली आहे़