डेंग्यूसदृश्य आजाराने इटकळमधील चिमुकलीचा मृत्यू

By Admin | Updated: February 2, 2015 01:12 IST2015-02-02T01:09:49+5:302015-02-02T01:12:54+5:30

नळदुर्ग : डेंग्यूसदृश्य आजाराने एका ६ वर्षीय मुलीचा सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ मयत मुलगी ही तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील रहिवाशी आहे़

Disease-related illness, death of a sperm in Itkal | डेंग्यूसदृश्य आजाराने इटकळमधील चिमुकलीचा मृत्यू

डेंग्यूसदृश्य आजाराने इटकळमधील चिमुकलीचा मृत्यू


नळदुर्ग : डेंग्यूसदृश्य आजाराने एका ६ वर्षीय मुलीचा सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ मयत मुलगी ही तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील रहिवाशी आहे़ दरम्यान, येथील उपकेंद्रात एकही अधिकारी, कर्मचारी कार्यरत नाही़ त्यामुळे ग्रामस्थांना खासगी रुग्णालय गाठावे लागत आहे़
मिळालेल्या माहितीनुसार, इटकळ येथील हरिदास मंडलिक यांची मुलगी आरती मंडलिक (वय-०६) हिस गत आठ दिवसांपूर्वी तापाची लागण झाली होती़ प्रारंभी इटकळ येथील खासगी रूग्णालयात औषधोपचार करण्यात आले़ मात्र, ताप कमी होत नसल्याने सोलापूर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ तेथेही ताप कमी होत नसल्याने तिच्या रक्ताची तपासणी करण्यात आली होती़ त्यावेळी तिला डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाल्याचा अहवाल आला होता़ तेथून नंतर तिला शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र, उपचार सुरू असताना रविवारी सकाळी आरतीचा मृत्यू झाला़ या घटनेने इटकळ व परिसरात हळहळ व्यक्त होत असून, डेंग्यूच्या आजारामुळे भितीचे वातावरण पसरले आहे़ आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष देवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे़
दरम्यान, अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत इटकळ येथे उपकेंद्र आहे़ मात्र, या उपकेंद्रात कुणीही कर्मचारीही कार्यरत नाहीत़ केवळ आशा कार्यकर्तीवर उपकेंद्राची धुरा सोपविण्यात आली आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना खासगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले़ (वार्ताहर)४
अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ सचिन यतनाळकर म्हणाले, इटकळ येथे आरोग्य सहाय्यक एस़एक़दम, आरोग्य सहाय्यीका बीक़े़शिंदे, आरोग्यसेविका यू़एमक़ळपे यांनी भेट दिली आहे़ इटकळ येथील २०० जणांची तपासणी करण्यात आली आहे़ कोणालाही तापाची लागण झाली नसून, उर्वरित ग्रामस्थांचीही तपासणी करण्यात येणार आहे़

Web Title: Disease-related illness, death of a sperm in Itkal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.