दसरा महोत्सव समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

By Admin | Updated: September 6, 2014 00:26 IST2014-09-05T23:51:11+5:302014-09-06T00:26:40+5:30

हिंगोली : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या तयारीला सुरूवात झाली आहे.

Discussion on various topics in the meeting of the Dasara Mahotsav Committee | दसरा महोत्सव समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

दसरा महोत्सव समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

हिंगोली : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दसरा महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध विषयांवर सांगोपांग चर्चा झाली.
अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी होते. याप्रसंगी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष तथा उपविभागीय महसूल अधिकारी खुदाबक्ष तडवी, सचिव तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर, गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड, नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये व्यापारी, उद्योजक, पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी महत्वपूर्ण सूचना केल्या. त्याची दखल घेत तहसीलदार कडवकर यांनी दसरा महोत्सवानिमित्त भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनीतील विविध स्टॉल्ससाठी १३ सप्टेंबर रोजी लिलाव प्रक्रिया घेण्यात येईल, असे सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी गगराणी यांच्या सूचनेवरून, दुकानदारांना डिपॉझिट भरल्याशिवाय लिलाव प्रक्रियेत भाग घेता येणार नाही अशी अट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ही प्रदर्शनी यंदा १३ दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय विचाराधिन असल्याचे सांगितले. समितीमध्ये अनेकांची नावे असली तरी प्रत्यक्ष काम करताना कोणीच हजर राहत नसल्याची खंत व्यक्त करीत दसरा उत्सव म्हणजे हिंगोलीची शान असून ती वाढविण्यासाठी सर्वांनी उत्फूर्तपणे पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा तहसीलदार कडवकर यांनी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे उपविभागीय अधिकारी तडवी यांनी सांगितले.
बैठकीस व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, ज्येष्ठ पत्रकार शरद जयस्वाल, शांतीलाल जैैन, ओमप्रकाश बियाणी, विश्वास नायक भगवतीकर, सुनील मानका, बाबाराव घुगे, प्रकाश बांगर, वि.वा. हवालदार, गोविंद चौधरी, गोपाल दुबे, कमलकिशोर काबरा, सूर्यकांतअप्पा गोटरे, चंदु लव्हाळे, राजू उपाध्ये, निलेश बगडिया, पुरण शर्मा, गोपाल अग्रवाल, एस. एम. देशमुख, विनोद चितलांगे, अतुल बोरकर, दिनेश बगडिया, पंकज अग्रवाल, देवानंद वाबळे, संजय जयस्वाल आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Discussion on various topics in the meeting of the Dasara Mahotsav Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.