भाजपाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
By Admin | Updated: November 19, 2014 13:09 IST2014-11-19T13:05:44+5:302014-11-19T13:09:40+5:30
शहरात भारतीय जनता पार्टीची जिल्हा बैठक १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

भाजपाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
हिंगोलीत बैठक : अनेक जणांचा पक्षप्रवेश
हिंगोली : शहरात भारतीय जनता पार्टीची जिल्हा बैठक १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
आ. तान्हाजीराव मुटकुळे, संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत आ. मुटकुळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गाव तेथे शाखा अंतर्गत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३00 कार्यकर्त्यानी भाजपात प्रवेश घेतला.
तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त करण्यासाठी व पाणीटंचाई, गुराढोरांना चाराटंचाई या विषयावर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हय़ात ५0 हजार सदस्य नोंदणी करण्यासंदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीस प्रा. दुर्गादास साकळे, सुरजितसिंह ठाकूर, बी. डी. बांगर, गोवर्धन वीरकुँवर, पांडुरंग पाटील, शिवदास बोड्डेवार, पुंजाजी गाडे, अँड. गणेशराव ढाले, वसमतचे नगराध्यक्ष भगवानराव कुदळे, पी. आर. देशमुख , नगरसेवक गणेश बांगर, उमेश नागरे, अन्वेकर, वैजनाथ गुंडाळे, मीराताई देशमुख, उज्ज्वलाबाई तांभाळे, यशोदाताई कोरडे, फुलाजी शिंदे, सखाराम इंगळे, संतोष टेकाळे, सखाराम मुटकुळे, रामरतन शिंदे, राज तांदळे, बाबा घुगे, संजय ढोके, संजय कावडे, मनोज शर्मा, कृष्णा रुहटीया, बंडू कर्हाळे, प्रभाकर शेळके, विष्णू जाधव, दीपक मांजरमकर, रविकुमार कान्हेड, रामेश्वर देशमुख, विनायक महाराज, अशोक ढेंगल, कांताराव कोटकर, प्रशांत सोनी, नामदेव वाणी, सुभाष लदनिया, संजय कावरखे, रामचंद्र बेले, पुरुषोत्तम गडदे, महेश भिसे, आनंदराव गुव्हाडे आदींची उपस्थिती होती. /(प्रतिनिधी)